मुलाच्या लग्नाला किती खर्च आला ? शेतकर्‍याने विचारला दानवेंना जाब

0
नाशिक / दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवार सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना शेतकार्‍यांशी संवाद साधने महागात पडले.
खतवड येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी, ङ्गसाहेब मी भाजपचाच कार्यकर्ता असून मी नेहमी भाजपलाच मतदान करतो.
साहेब आपण आपल्या मुलाच्या लग्नासाठी किती खर्च केला ? असा प्रश्न विचारत रावसाहेब दानवेंची चांगलीच गोची केली.

शेतकर्‍यांच्या या प्रश्नाने उपस्थितांमध्ये हशा पिकला तर दानवेंनी स्मित हास्य देत उत्तर देण्याचे टाळले.

शेतकर्‍याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे याविषयी भारतीय जनता पक्षाचे वेगळे धोरण नसून त्याला आमचा विरोध नाही. परंतु योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*