जळगाव रनर ग्रुपच्या जीवन वनारसे यांचे कोल्हापूरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये यश

0
जळगाव : प्रतिनिधी ।  जळगाव रनर ग्रुपच्या जीवन रघुनाथ वनारसे [नाचणखेडा,ता.जामनेर जि.जळगाव] कोल्हापूर येथील 50 किलोमीटर रग्गेडियन/सह्याद्री/अल्ट्रा मॅरेथॅानमध्ये चौथा क्रमांक मिळविला.
जळगावव रनर ग्रुपचे जीवन रघुनाथ वनारसे, यांनी  कोल्हापुर येथे पार पडलेल्या 50 किलोमीटर रग्गेडियन/सह्याद्री/अल्ट्रा मॅरेथॅानमध्ये वनारसे यांचा चौथा क्रमांक मिळविला. हि मॅरेथॅान जिवन वनारंसेनी 6 तास 24 मिनिटे व 10 मॅरेथॉन सेकंदात पुर्ण केली. हि मॅरेथॅान एक ऐतिहासिक मॅरेथॅान होती. पन्हाळा गड ते पावनखिंड या अत्यंत अवघड (टफ) मार्गावर ही मॅरेथॅान होती.
संपूर्ण मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला होता. 20 किलोमीटर असलेली दलदल, गुडघ्यापर्यंत पाय चिखलात फसायचे. अतिशय खडतर आणि डोंगराळ भागात हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
भारतीय डाक विभागाचे कर्मचारी जीवन वनारसे यांनी 50 किलोमीटर रग्गेडियन/सह्याद्री/अल्ट्रा मॅरेथॅानमध्ये वनारसे यांचा चौथा क्रमांक मिळविल्या बद्दल  जळगाव रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव,डाॅ.रवि हिराणी,विक्रांत सराफ,निलेश भाडांरकर, अविनाश काबरा डॉक्टर विवेक पाटील, डॉक्टर प्रशांत देशमुख , उमेश महाजन ,ज्ञानेश्वर बढे याांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*