नरभक्षक बिबट्याचा अखेर खात्मा

0

चाळीसगाव । तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत पसरविणार्‍या व सात जणांसह शंभरच्यावर प्राणी फस्त करणार्‍या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला अखेर आज यश आले आहे.

शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वरखेडे खुर्दे येथे शार्पशूटर नवाब खान यांनी बिबट्याला एकच गोळी घालुन त्याचा खेळ खल्लास केला. बिबट्याला मारण्याची बातमी समजातच सोशल मिडियावरुन वनविभागावर अभिनंदनाचा वर्षाव रात्रभर सुरु होता. घटनास्थळी आमदार उन्मेष पाटील, मुख्यवनसंरक्षक एम.के.राव व तहसीलदार के.बी.देवरे हे लगेच पोहचले होते.

शनिवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान वरखेडे लोेंढे बॅरेजचे काम करीत असलेल्या मजुंराना बिबट्या वरखेडे खुर्दे कडे जाताना दिसला . याची माहिती त्यांनी तात्काळ वनविभागाला दिली. आधिपासून गस्तीवर असलेले शार्पशूटर नवाब खान व त्यांची टिम अवघ्या काही मिनिटात त्या ठिकाणी पोहचली. व त्यांनी बिबट्याला घेरण्यासाठी गेम पॅनल बनविला.

बिबट्या नाल्यातून प्रवास करत असल्यामुळे वरखेर्डे खुर्दे येथील खडका नाला परिसरात शार्पशूटर नवाब खान व त्यांच्या टिमने सापळा लावला.

खडका नाला परिसरातच भिल्ल व तिरमली ह्या दोन महिला आधिच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या, आणि बिबट्या पुन्हा त्याच भागात तिसर्‍या शिकारीच्या शोधात चालला होता.

खडका परिसरातच बिबट्या रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान आला आणि शार्पशूटर नवाब खान यांनी त्याच्यावर एकच गोळी झाडुन त्याला ठार केले.

बिबट्याचा मृतदेह शासकिय वाहनातून शवविच्छेदनासाठी वनविभागाने नेला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार उन्मेष पाटील, तहसीलदार कैलास देवरे, मुख्यवनसंरक्षक एम.के.राव हे घटनास्थळी पोहचले आणि शार्पशूटर नवाब खान व त्यांचे टिमचे अभिनंदन केले.

गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे बिबट्याला नदी उतरुण पळणे शक्य झाले नाही. दुपारी चार वाजेपासून नवाब शहापत अली खान त्यांचा मुलगा व टिम बिबट्याला टिपण्यासाठी वरखेडे परिसरात दबा धरुन बसलेली होती.

गेल्या चार महिन्यापासून थैमान घालणार्‍या बिबट्याला खाजगी शूर्टर नवाब यांच्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीने रात्री 10.30 वाजेच्या सुमारास टिपले आणि संपूर्ण वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला.

पुढे वरिष्ठांच्या आदेशाने बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून बिबट्या नरभक्षक का झाला यांचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नरभक्षक बिबट्या जरी ठार झाला असला तरी देखील या भागात अजुन बिबटये आहेत का यांचा शोध वनविभागाकडून घेण्यात येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*