मु.जे. महाविद्यालयात महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय परिषद

0

जळगाव | प्रतिनिधी :  येथील मू.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे ११ वी भारतीय महिला दार्शनिक परिषद दि.१५ ते १७ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवस तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून महिलांच्या प्रश्नांवर मंथन होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेतर्फे भारतीय महिला दार्शनिक परिषदा यापूर्वी मुंबई विदयापीठ, पंजाब विदयापीठ, चंदीगड, रांची विदयापीठ, झारखंड, पुणे विदयापीठ, शंकराचार्य विदयापीठ, केरळ, उस्मानिया विदयापीठ, हैद्राबाद, विनोबा भावे विदयापीठ (हजारीबाग, झारखंड), राणी दुर्गावती विदयापीठ (जबलपूर, मध्यप्रदेश), बरकततुल्ला विदयापीठ, भोपाळ येथे झाल्या असून दहावी परिषद रांची येथे झाली होती.

११ वी परिषद मूळजी जेठा महाविदयालय जळगाव येथे होत आहे.दि. १५ रोजी सकाळी १०.३० वाजता जुना कॉन्फरन्स हॉल येथे दिल्लीचे प्रा.डॉ.रजनीश शुक्ला आणि अलाहाबाद विदयापीठातील तत्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.जटाशंकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.प्रकाश पाटील, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.राजकुमारी सिन्हा, कार्याध्यक्षा प्रा.छाया राय, त्रैमासिक दार्शनिकचे संपादक प्रा.डॉ.रमेशचंद्र सिन्हा, बिकानेर विदयापीठातील माजी कुलगुरू प्रा.डॉ.सी.पाडया, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, संयोजन सचिव व तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ.रजनी सिन्हा उपस्थित राहतील.

उद्घाटनाानंतर स्वातंत्र्य सैनिक आणि राजस्थानच्या सिंघानिया विदयापिठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.रामजी सिंग यांचे बिजभाषण आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ.माधवी कवी (पुणे), निलिमा पाठक (रांची), डॉ.रजनी सिन्हा (जळगाव), प्रा.डॉ.विनिता अवस्थी (होशंगाबाद, उ.प्र.), डॉ.गीता मेहता (मुंबई), डॉ.ज्योत्स्ना श्रीवास्तव (बनारस विदयापीठ) हे सहभागी होणार आहेत.

दि.१६ रोजी सकाळच्या पहिल्या सत्रातवाराणसी विदयापीठाच्या डॉ.उर्मिला चतुर्वेदी या भारतीय तत्वज्ञान आणि नितीशास्त्र, भोपाळ येथील बरकततुल्ला विदयापीठाच्या डॉ.साधना धनोरिया योगा तत्वज्ञान विषयी तर डॉ.मंगला आठल्ये ज्ञान व सत्ता शास्त्रविषयी मांडणी करतील.

यासोबत डॉ.मनाली लोंढे, मुंबई आणि डॉ.शैलेश मेहता, सुरत हेदेखील सहभागी होतील. द्वितीय सत्रात महिलांच्या समस्या आणि न्याय याविषयी डॉ.व्ही.पद्मावती, हैद्राबाद आणि डॉ.विणा शोहन, गया (बिहार) हे आहेत. तृतीय सत्रात भारतीय तत्वज्ञानाची गरज याविषयी डॉ.आभा होळकर, इंदौर व डॉ.एम.डी.वर्मा, रांची, डॉ.व्ही.एस.कंची हे सहभागी होतील. दि.१७ रोजी सकाळच्या सत्रात डॉ.यामीनी सहाय (हजारीबाग, झारखंड), डॉ.विनिता कश्यप, झारखंड, डॉ.मंगला चिंचोलकर, डॉ.बालाजी नाडवाडे, नांदेड, डॉ.विजेता सिंग, रांची, डॉ.प्रीती सिंग, जयपूर हे सहभागी होतील.

यानंतर ११ वाजता समारोप सत्रात अध्यक्षस्थानी मुक्ताईनगरच्या खडसे महाविदयालयाचे प्राचार्य व्ही.आर.पाटील राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानच्या सिंघानिया विदयापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सोहनराज तातेर, लखनौच्या डॉ.पूजा व्यास, सुरत येथील नेत्रतज्ञ डॉ.शैलेश मेहता हे आहेत.

पत्रकार परिषदेला उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, संयोजन सचिव व तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ.रजनी सिन्हा, सहसचिव डॉ.व्ही.एस.कंची आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*