मलकापुरच्या वाघुडजवळ नॅनो कारला भरधाव ट्रकची धडक : चौघे जखमी

0
मलकापूर | | प्रतिनिधी :  मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथून अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून घराकडे अकोला येथे जाणार्‍या नॅनो कारला ग्राम वाघुड नजीक अंकुर सिड्स जवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याची घटना दुपारी दोन वाजेदरम्यान घडली. या अपघातात नॅनोमधील पाच जणांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून जखमीवर डॉ.गौरव कोलते यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

टाकळी घडेकर येथे सखाराम शुक्ला यांच्या नातेवाईकाकडिल अंत्यसंस्कारासाठी अकोला येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील हेडक्लार्क मोहनप्रसाद बिहारीलाल दुबे, अकोला वनविभागाचे रेंजर ऑङ्गिसर रमेश बिहारीलाल दुबे, सौ.संगिता मोहनप्रसाद दुबे, सौ.अनिता रमेश दुबे, सौ.गिता अनिल दुबे हे नॅनो गाडी क्र. एमएच ३० पी ४०६१ ने अकोला येथून आले होते.

अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून घराकडे जात असतांना अंकुर सिड्स जवळ समोरून भरधाव वेगारे येणार्‍या ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ५३३६ ने नॅनोकारला जबर धडक दिली.

या घटनेत नॅनो कारचा संपूर्ण चुराडा झाला असून या अपघातात रमेश दुबे (रा.व्हीआयबी कॉलनी, गौरश्रम रोड अकोला), मोहनप्रसाद दुबे (जुना राधाकिसन प्लॉट), सौ.संगिता मोहनप्रसाद दुबे, सौ.अनिला रमेश दुबे, सौ.गिता अनिल दुबे असे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताबरोबर पत्रकार गजानन ठोसर, विरसिंह राजपूत, कैलास ताठे, प्रल्हाद ढोले आदींनी प्रमोद भिसे यांच्या खाजगी रूग्णावाहिकेद्वारे जखमींना प्राथमिक उपचारार्थ डॉ.गौरव कोलते यांच्या रूग्णालयात हलविले.

घटनास्थळी शहर पोलिस निरिक्षक अंबादास हिवाळे, पोलिस उपनिरिक्षक संजीवनी पुंडगे, पोउनि साहेबराव खांडेकर, पोउनि शैलेश पवार, पोकॉ विनोद गायकवाड, पोहेकॉं लिंबाजी राठोड, पोकॉ इस्तयाकभाई, पोकॉ सरकटे आदींनी येवून वाहतूक सुरळीत केली असून ट्रक चालकास ताब्यात घेतले असून ट्रक पो.स्टे.त जमा केला आहे.

LEAVE A REPLY

*