यावल न.पा.सभागृह झाले खानावळ : जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

0
यावल |  प्रतिनिधी  :  यावल नगरपालिकेच्या सभागृहाची नगराध्यक्ष व नगराध्यक्षपती, मुख्याधिकारी व काही नगरसेवकांनी सभागृहात चक्क खानावळ करून सभागृहाचा अपमान केला असून त्यांच्या या पराक्रमाची जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याकडून चौकशी करावी व कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रावेर न.पा.चे मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे हे ३० नोव्हेंबर १७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने यावल येथे दि. ६ डिसेंबर १७ रोजी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम कर्मचार्‍यांतर्ङ्गे ठेवण्यात आला होता. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था पालिका प्रांगणात करण्यात आली होती.

मात्र नगराध्यक्षा सौ.सुरेखा कोळी, त्यांचे पती शरद कोळी, उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्यासह नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, ङ्गैजपूरच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, सेवानिवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी पालिका सभागृहाच्या टेबल व बाकांचा वापर यावेळी जेवणासाठी केला.

गेल्या वर्षी वैशिष्ट्य पुर्ण योजनेतून १८ लाख रूपये खर्चुन सभागृहात अद्ययावत व वातानुकूलीत करण्यात आले. या ठिकाणी पालिकेची सभा घेण्यात येते. त्या सभागृहाचा अधिकारी व पदाधिकार्‍यांनी चक्क खानावळ म्हणून गैर उपयोग करून सभागृहाचा अवमान केला. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्यावर अपात्रतेची तर मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील न.पा. प्रकल्प अधिकारी राजेश कानडे यांना देण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, रूख्माबाई भालेराव, श्री.महाजन, पौर्णिमा ङ्गालक, नौशाद तडवी, डॉ.कुंदन ङ्गेगडे, गणेश महाजन, मुबारक तडवी, गिरिश महाजन, राजेंद्र ङ्गालक आदी उपस्थित होते.

पालिका सभागृहात अधिकारी व नगरसेवकांनी जेवण घेतले हे खरे आहे. मात्र त्यात मद्य किंव मांसाहार केलेला नाही.

मिटींगच्या वेळी नगरसेवक नाश्ता करतात तेव्हा मात्र सभागृहाचा अवमान होत नाही. त्यामुळे आता सभागृहाचा अवमान झाला हा आरोप मुळात खोटा आहे.
-सुरेखा कोळी, नगराध्यक्षा

LEAVE A REPLY

*