81 गावांच्या पा.पु.योजनेसाठी 32 कोटी मंजूर

0

बोदवड । मुख्यमंत्री ग्रामीण पयेजल कार्यक्रमांतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावे आणि भुसावळ तालुक्यातील 31 गावे या दोन्ही निविदांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी एकुुण 32 कोटी 7 लाख रुपये मंजुर करण्यात आले.

परिसराचे आमदार तथा माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांना पाणी पुरवठा मंत्रालयाकडून अशा आशयाचे लेखी पत्र आजच प्राप्त झाले आहे. आ. खडसे यांच्या प्रयत्नातुन तिन्ही गावातील 82 गावे नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी पात्र होणार आहेत. 32 कोटींचा निधी मंजूर करणेकामी आ. खहसे यांनी महत्वाची भूमिका निभावली. निधी मंजूर झाल्याने या योजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम तातडीने सुरु करण्यात येणार आहे.

ओ. डी. ए. म्हणजेच ओव्हरसिज डेव्हलपमेंड अ‍ॅथॉरिटी या योजनेतंर्गत अनेक गावासाठी ब्रिटीश संस्थाकडून पिण्याच्या पाण्यासाठी योजना आखण्यात आल्या. सन 1985 मध्ये बोदवड तालुक्यातील 48 आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 3 आणि भुसावळ तालुक्यातील 31 अशा एकुण 82 गावांसाठी ओ.डी.ए योजनेतर्गत पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. ही योजना प्रत्यक्षात सन 1996 मध्ये पूर्णत्वास आली.

या योजनेसाठी वापरण्यात आलेली साधनसामुग्री जास्तीत जास्त 10 वर्ष कार्यान्वित राहु शकते, असा मानक ओ.डी.ए योजनेच्या प्रशासकांनी घातला. त्यानुसार ही योजना सन 2006 मध्ये कालबाह्य झाली. मात्र 2006 नंतरही आजतागत ही योजना विविध अडथळे पार करीत सुरु आहे. वारंवार होणारी गळती, वीज बीलाची थकीत रक्कम, संबधीत ग्रामपंचायतीकडून मिळत नसलेली पाणीपट्टी आदि अनेक कारणांवरुन ही योजना रखडली. अशा स्थितीत या योजनेसाठी सरकारी अनुदान तात्काळ मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. एकनाथराव खडसे यांनी गांभिर्याने प्रयत्न करुन योजनेसाठी समाधानकारक निधी प्राप्त करुन दिला आहे.

योजनेला संजीवनी आ. खडसेंमुळे – भुसावळ, मुक्ताईनगर, आणि बोदवड तालुक्यातील एकुण 82 गावांना नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योेजनेतील हेडवर्क्स दुरुस्ती, अशुद्ध, शुद्ध पाणी उर्ध्ववाहिनी, अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, शुद्ध पाणी संच आणि पंपगृह, मुख्य संतुलन जलकुंभ, उंच जलकुंभ शुद्ध पाणी गुुरुत्ववाहिनी अस्तित्वातील जलकुंभाची दुरुस्ती आणि इतर किरकोळ कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता होती.

याकामी आ. एकनाथराव खडसे यांनी कसोशीने सरकारकडे मागणी लाऊन धरली. त्यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर तथा समिती उपाध्यक्ष राज्यमंत्री सदाभाऊ खोत तथा इतर समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावांसाठी 20 कोटी 20 लाख तर भुसावळ तालुक्यातील 31 गावांसाठी 11 कोटी 87 लाख असे एकुण 32 कोटी 7 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली.

योजनेमध्ये नियमितता अपेक्षित – आ. एकनाथराव खडसे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतुन आज रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधीच्या माध्यमातुन संजीवणी प्राप्त झाली असली तरी पुढे ही योजना अगदी नियमितपणे सुरु राहावी यासाठी प्रशासनासह लाभार्थी गावकर्‍यांनीही काळजी घेणे महत्वाचे आहे.

जिल्हा परिषद प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी व अधिकारी पालकमंत्री संबधीत खासदार व आमदार यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन योेजनेशी संबधीत कर्मचार्‍यांची वेतने, वीजबिले, देखभाल खर्च यासाठीचा खर्च सुरळीतपणे नियमित राहावा यासाठी लाभार्थी गावातील गावकर्‍यांनी नियमितपणे पाणीपट्ठी भरणे गरजेचे आहे.

गावकर्‍यांनी नियमितपणे पाणीपट्टी पैसा नियमितपणे योजनेकडे जमा करणे अनिवार्य झाल्यास योजनेमध्ये नियमितपणा येऊ शकेल. लोकप्रतिनिधी म्हणून माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी निधी प्राप्त करुन दिला असला तरी आगामी काळात योजना सुरळीतपणे नियमित व्हावी यासाठी संबधीत गावांनी काळजी घेणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

*