रावेरचा लाचखोर फौजदार गजाआड

0

रावेर । येथील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण निकाळजे यांना दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निरुळ, ता. रावेर येथील व्यक्तीच्या मित्राची मार्बल भरलेला ट्रक सोडण्यासाठी श्री.निकाळजे यांनी दि.5 नोव्हेंबर रोजी दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने आज दि.07 नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास तक्रारदार यांचेकडुन लाचेची रक्कम आज पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे सापळा अधिकारी जी.एम.ठाकुर यांच्या
मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस खात्याबद्दल आधीच नागरिकांमध्ये नाराजी असून पोलीस उपनिरीक्षक श्री.निकाळजे यांनी घेतलेल्या 10 हजार लाचेमुळे त्यात अधिक भर पडली आहे.

LEAVE A REPLY

*