जळगावात पहिल्यांदाच करमुल्य निर्धारण

0

जळगाव । जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील मिळकतींचे क्षेत्रफळानुसार करमुल्य निर्धारण करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे अतिरिक्त बांधकामाची आणि अनधिकृत बांधकामाची नोंद होणार असल्याने महापालिकेचे दुपटीने उत्पन्न वाढणार आहे. सर्व्हेक्षणाचे काम मार्च अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली.

शहरात दर पाच वर्षांनी करमुल्य निर्धारण करणे अपेक्षित आहे. परंतु जळगाव शहरात अद्यापपर्यंत करमुल्य निर्धारण न केल्याने अतिरिक्त बांधकामाची कर आकारणी झालेली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.

त्यामुळे क्षेत्रफळानुसार कर आकारणी करण्यासाठी अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्ट या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव शहरातील चार प्रभागांपैकी प्रभाग समिती क्रमांक 1 चे काम पूर्ण झाले असून प्रभाग समिती क्र.4 चे काम सुरु आहे. तर प्रभाग समिती क्र.2 व 3 मध्ये प्रत्येक घराला नंबरींग देण्याचे काम करण्यात येत आहे.

मिळकतींचे होणार जीआयएस टॅगिंग
करमुल्य निर्धारण करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींकडून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मिळकतींना नंबरींग करुन नकाक्षे आणि छायाचित्र घेवून जीआयएस टॅगिंग केली जाणार आहे.

त्यामुळे मालमत्ताकराची बिले संगणकीकृत करुन ऑनलाईन कर भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

ड्रोनद्वारे छायाचित्र
युएव्ही ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करुन छायाचित्र तयार करण्यात येणार आहे. करमुल्य निर्धारणाचे काम जळगाव शहरात पहिल्यांदाच होत असून मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार आहे असल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली.

दरम्यान चारही प्रभाग समितीतील प्रभाग अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेवून सुचना देण्यात आली. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार तसेच कंपनीचे प्रतिनिधी अमोल डोईफोडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*