गाळे ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची हालचाल

0

जळगाव । मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत दाखल केलेली गाळेधारकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गाळे ताब्यात घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रशासनाकडून हालचाल सुरु झाली आहे. दरम्यान, याप्रक्रियेबाबत प्रशासनाने शासनाला कळविले आहे.

मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली होती. गाळे कराराने देण्याबाबत प्रशासनाने ठराव केला होता.

मात्र या ठरावाविरोधात गाळेधारकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर औरंगाबाद खंडपीठाने दि.14 जुलै 2017 रोजी दोन महिन्या गाळे ताब्यात घेण्याची प्रशासनाने प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता.

परंतु या निकालाविरोधात महात्मा फुले व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कामकाज झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवून गाळेधारकांची याचिका फेटाळली.

त्यामुळे गाळे ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने गाळे ताब्यात घेण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. तसेच याबाबतची माहिती प्रशासनाला देखील कळविले आहे.

1387 कुलूपांची करणार खरेदी
मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळे आहेत. गाळे ताब्यात घेतल्यानंतर त्या गाळ्यांना कुलूप लावण्यासाठी प्रशासनाकडे 1 हजार कुलूप आहेत.

उर्वरित 1387 कुलूप खरेदी करण्यात येणार आहे. तसेच चित्रीकरण करण्यासाठी चार ते पाच व्हिडीओ कॅमेरे घेण्यासाठी प्रशासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गाळे ताब्यात घेतले जाणार असल्याने गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*