Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश

गाडी थांबवली नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अ‍ॅपल कंपनीचा मॅनेजर ठार

Share
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलनं अॅपल कंपनीच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मॅनेजर यांचं नाव विवेक तिवारी असून ते शुक्रवारी रात्री आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम आटपून घरी जात असताना ही घटना घडली

शुक्रवारी रात्री विवेक तिवारी आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या गाडीनं घरी जात असताना पोलिसांनी त्यांना गाडी थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर विवेक यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि हे प्रकरण वाढलं.

प्रकरण वाढल्यानंर पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यानं विवेक यांच्यावर गोळी झाडली. यानंतर विवेक यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

‘विवेक यांना गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही त्यांनी गाडी थांबवली नाही, उटल माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला’ त्यामुळं स्वत:चा बचाव करण्यासाठी मी त्यांच्यावर गोळी झाडली असं संबंधित घटनेतील पोलिस कॉन्स्टेबलनं म्हटलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!