ई-तक्रार केंद्राचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकरिता पोलिस अधिक्षक कार्यालयातील सुविधा केंद्रात सिटीझन पोर्टल या ई-तक्रार केंद्राचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, पीएसआय अंगत नेमाणे, सायबर सेलचे श्री. खंबाट यांच्यासह सीसीटीएनएचचे कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस अधिक्षक कार्यालयातील सुविधा केंद्रात सिटीझन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना हरविलेल्या व्यक्ती, फरार आरोपी, अनोळखी मृतदेह, अटक आरोपींची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

सिटीझन पोर्टल अंतर्गत ई-तक्रार केंद्रामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यमुहे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*