अंदाजपत्रकासाठी सोमवारपर्यंत माहिती न दिल्यास कारवाई

0

जळगाव । महानगरपालिकेचे सन 2017-18 चे सुधारित आणि 2018-19 चे मुळ अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांंकडून वास्तविक आणि अचूक माहिती सादर करण्यासाठी दि.11 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुदतीत माहिती सादर न केल्यास संबंधित विभाग प्रमुखांविरुद्ध कारवाई केली जाईल. अशी तंबी प्रभारी आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिली आहे.

महानगरपालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात नुकतीच बैठक घेवून प्रभारी आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या.

अंदाजपत्रकासाठी जमा खर्चाची वास्तविक आकडेवारी सादर करावी, मालमत्ताकराची मागणी व वसुलीची आकडेवारी अचूक द्यावे, अंध व अपंग, महिला बालकल्याण, आर्थिक दुर्बल घटक, क्रीडा व आरोग्यवरील खर्चाची अंदाजपत्रकीय तरतुद शासन निर्णयानुसार करावी.

सन 2018-19 मध्ये काही कामे करावयाची असल्यास ते नमूद करुन त्याप्रमाणे तरतुद करावी, डबल एन्ट्री कोडींग दर्शवून माहिती पाठवावी, तसेच सर्व माहिती दि.11 डिसेंबपर्यंत पाठवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत माहिती न दिल्यास किंवा चूकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विभाग प्रमुखांविरुद्ध कारवाई करण्याची तंबी प्रभारी आयुक्तांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*