रेल्वेत चढतांना पाय घसरुन पडल्याने महिला जखमी

0

जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावरील फ्लॉटफार्म क्रमांक 1 वर रेल्वेत चढत असतांना पाय घसरून पडल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घडली. नागरिक व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने महिलेला तात्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील रोहीदास हरचंद जाधव हे पत्नी सुमनबाई जाधव व मुलगा यांच्या सोबत न्यायालयीन कामकाजासाठी जळगावात आले होते.

काम आटोपून ते चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे जाण्यासाठी जळगाव बसस्थानकावर आले. यावेळी सायंकाळी 5.45 वाजता भुसावळ – नशिक शटल पॅसेंजर जळगाव रेल्वेस्थानकावरील फ्लॉटफार्म क्रमांक 1 वर आली.

त्यानंतर रोहीदास जाधव, त्यांची पत्नी सुमनाबाई जाधव व मुलगा भुसावळ- नशिक पॅसेंजर मध्ये चढत असतांना अचानक पाय घसरल्याने सुमनबाई जाधव वय 55 हया रेल्वे व फ्लॉटफार्मच्या आत अडकल्या

यातच रेल्वे सुरु झाल्याने काही नागरिकांनी चैन ओढून गाडी थांबविली. महिला रेल्वे व फ्लॉटफार्मच्या आत अडकल्याचे पाहताच नागरिक व लोहमार्ग पोलिस योगेश चौधरी, भारत पवार, अडकने यांनी तात्काळ या महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान महिलेच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे 10 मिनीटे पॅसेजर फ्लॉटफॉर्म क्रमांक 1 वर थांबवून होती.

LEAVE A REPLY

*