नरभक्षक बिबट्याचा हैदोस सुरुच साकुर येथे सात वर्षीय बालकाचे शीर केले धडापासून वेगळे

0

चाळीसगाव । तालुक्यातील उपखेड येथे बुधवारी(दि.6) शेतात कापुस वेचणी करणार्‍या 38 वर्षीय महिलेवर नरभक्षक बिबट्याने दुपारी हल्ला केला. सुदैवाने महिला वाचली.

मात्र, रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने उपखेड जवळून अवघ्या दोन किलोमिटर अतंरावर असलेल्या साकुर (ता.मालेगांव) येथे कुणाल प्रकाश अहिरे ह्या सात वर्षीय बालकावर हल्ला करुन ठार केले.

नरभक्षक बिबट्याने बालकाला ऊसाच्या शेतात फरफट नेले आणि त्यांच्या मानेेचे लचके तोडत शीर धडा वेगळे केले. याआगोदर बिबट्याने बकरीच्या पिल्लाचा देखील फडशा पडला. बिबट्याने बालकाला ठार केल्यामुळे ग्रामस्थांमधून वनविभागावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

नरभक्षक बिबट्याने बुधवारी तालुक्यातील उपखेड येथील गायत्री सुरेश पाटील यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर उपखेड जवळुन दोन किलोमिटर असलेल्या मालेगांव तालुक्यातील साकुर येथे त्याने आपला मोर्चा वळवत साकुर ते देवघट रस्त्यालगत वस्तीवर राहणार्‍या रतन शंकर बागूल यांच्या शेतातातून शेकोटीजवळ बसलेल्या त्यांचा नातू कुणाल प्रकाश अहिरे (वय-7) यांच्यावर हल्ला केला.

रात्री 9 वाजेच्या सुमारास कृणालला वस्तीजवळून उचलून ऊसाच्या शेतात नेले. याठिकणी त्यांच्या मानेचे लचके तोडून दोन तुकडे केले. घटनेची माहिती मिळताच आधीपासून गस्तीवर असलेले वनविभागाचे कर्मचारी व तहसीलदार कैलास देवरे तात्काळ घटनास्थळी पोहचले. संतप्त ग्रामस्थांनी ऊसाच्या शेतात कोयते घेऊन प्रवेश केला.

दोन तासानंतर बालकाचे धड मिळून आले. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी वनविभाग व प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला. बिबट्या जर तुमचा कडून मारला जात नसेल तर ग्रामस्थांना त्याला मारण्याचे आदेश द्या! अशा देखील मागणी केली.

घटनास्थळी मालेगांवचे तहसीलदार शिवकुमार अवळकठे यांनी धाव घेतली. मालेगाव वनविभागाचे आरएफओ व इतर आधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचले. नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतील घटना घडल्यामुळे तालुक्यात तैनात वनविभागाचे कर्मचारी परत पिलखोड येथे आल्याचे वृत्त आहे.

शाकी नाल्यामधून बिबट्याचा मार्गक्रमण
उपखेड गावापासून अवघ्या आर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या शाकी नाल्याजवळ शेतात कपाशी वेचणी करणार्‍या गायत्री पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानतंर त्याने शाकी नाल्यामधून पलायन केल्याचे सिध्द झाले आहे.

कारण हाच नाला पुढे साकुर ता.मालेगाव येथे जातो. नाल्यातून प्रवास करत त्याने कुणाल प्रकाश अहिरे याच्यावर हल्ला केला, वस्तीजवळून कृणालला उचलून नेले आणि ठार केले.

बिबट्या नाल्यातून जाऊ शकतो यांचा अंदाज वनविभागाचे कर्मचारी कसे घेऊ शकले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कर्मचार्‍यांनी केले काय?
उपखेड येथे महिलेवर हल्ला केल्यानंतर अवघ्या सात तासात पुन्हा बिबट्याने बालकावर व बकरीच्या पिल्लावर हल्ला करुन ठार केेले आहे.

महिलेच्या हल्ल्यानंतर आधीपासून मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या वनविभागाचा फौज फाटा काय करीत होता? असा प्रश्न ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात असून आता बिबट्याला मारण्यासाठी मिलटरी बोलवायची का? असा संप्तत सवाल केला जात आहे.

LEAVE A REPLY

*