25 कोटी रुपयांच्या निधीतील कामांच्या यादीत वॉर्डातील कामे नसल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत व्यक्त केला संताप

0

जळगाव । शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मनपाला 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता. याबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजूर झालेली यादी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे मंजूरीसाठी दिली आहे.

परंतू या यादीत भाजपाच्या नगरसेवकांच्या वार्डातील कामांचा समावेश नसल्यामुळे आज दुपारच्या सुमारास भाजपाच्याकाही नगरसेवकांनी महपालिकेत येवून यादी तपासून संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी 25 कोटींचा निधी दिला होता. मात्र निधी मिळाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये निधीच्या खर्चाबाबात वाद सुरु असल्याने निधीबाबात कोणत्याही कामे होत नव्हती.

पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर आले असतांना आ. राजूमामा भोळे, मनपाचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या बैठकीत 25 कोटीच्या निधीच्या कामांची यादी निश्चित करण्यात आली.

परंतू त्यामध्ये बदल केल्यानंतर अंतिम यादी तयार करुन ती यादी अंतरीम मंजूरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार होती.

परंतू या यादीमध्ये भाजपाच्या नगरसेवकांच्या वार्डातील कामांचा समावेश नसल्याचे माहित नगरसेवकांनी मनपात येवून संताप व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम विभागात घडला प्रकार
आज सकाळच्या सुमारास मनपाच्या नवव्या मजल्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागात भाजपाचे काही नगरसेवकांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी अंतरिम मंजूरीसाठी तयार करण्यात आलेल्या यादीची तपासणी केली.

परंतू यामध्ये भाजपाच्या काही नगरसेवकांच्या वार्डातील कामेच समाविष्ट नसल्याने त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. तसेच या कामांचे नियोजन करण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये देखील आम्हाला वगळल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला.

LEAVE A REPLY

*