अमृत योजनेतील पाणीपुरवठाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात

0

जळगाव । महापालिकेचा शासनाच्या अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत पाणीपुरवठा, भूमीगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाली आहे.

यामध्ये पाणीपुरवठा योजनेच्या कामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये भुयारी गटारीच्या कामाची निविदा मंजूर झाली असून त्याला अंतिम मान्यता मिळताच या कामाला देखील सुरुवात होणार आहे.

केंद्र शासन व राज्यशानाची अमृत योजने अंतर्गत जळगाव शहरासाठी भूमीगत गटारी व मल:निसारण योजनेसाठी 131 कोटी 56 लाखाची योजना आणि 191 कोटी 86 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.

यात दोन्ही योजनेचे कामांची जैन इरिगेशन कंपनीच्या निविदा मंजूर झाली असून पाणी पुरवठा योजनेच्या काम सुरू करण्याची आदेश दिले आहे. त्यानुसार कंपनीतर्फे लवकरच कामाला सुरवात होणार आहे.

त्याच बरोबर भूमीगत गटारी योजनेचे काम करण्याची जैन कंपनीची निविदा मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे मनपा प्रशासनाने पाठविलेले आहे.

परंतू याबाबत शासनाकडून अजून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता लवकर मिळाल्यास पाणीपुरवठा व भूमीगतगटारी योजनेचे काम एकाच वेळी सुरू झाल्यास या योजनेतून काम लवकर पूर्ण होणार आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या कामास कंपनीतर्फे यंत्र सामग्री, मनुष्यबळ तसेच प्रत्यक्ष जागांची मोजमाप कामांना सुरवात झालेली आहे.

या परिसरात होणार भूमीगत गटारीचे कामे
अमृत योजनेतील भूमीगत गटारींचे कामे मेहरुण, आदर्शनगर, गणपतीनगर, आकाशवाणी चौक, जोशीपेठ, सिंधी कॉलनी, मास्टर कॉलनी, रज्जा कॉलनी, कासमवाडी, सालारनगर, रामेश्वर कॉलनी, कालिकांमाता परिसर, का. ऊ. कोल्हे शाळा परिसर, जुने जळगाव परिसर, नविपेठ, पोलन पेठ, बळीरामपेठ, शिवाजी नगर, प्रजापत नगर, जगन्नाथ नगर, एस. टी. वर्क शॉप परिसर, कोर्ट चौकातील पूर्व भाग, सावित्रीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, कोंबडी बाजार, पांझरापोळ, जिल्हा रुग्णालय परिसर, रामदेवबाबा मंदिर परिसर, कंवरराम चौक, स्वातंत्र्य चौक पूर्व भाग, गांधीनगर, गुजराथी नगर, बि. जे मार्केट परिसर, मेस्कोमातानगर आदी ठिकाणी भूयारी गटारींचे कामे पहिल्या टप्यात सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

*