600 जणांना मनपाकडून सात दिवसांचा अल्टीमेटम

0

जळगाव । हगणदारीमुक्त मुक्त अभियानांतर्गत शासनाकडून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात असते. या अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात 1 हजार लाभार्थी आहे.

परंतू अनुदान घेवून शौचालय न बांधणार्‍या 91 जणांविरुद्ध मनपा प्रशासनाने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदिवला आहे. त्याचप्रमाणे 600 जणांना अंतिम नोटीसा बजाविण्यात आले आले असून सात दिवसात शौचालयाच्या कामाला सुरुवात न केल्यास त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.

केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्यांच्याकडे जागा आहे पण शौचालय नाहीत यांना शासन व महापालिका यांनी 17 हजार रुपयांचे अनुदान दिले जात असते.

तसेच मनपाने सुमारे 4 हजार 906 लाभार्थ्यांना हे अनुदान दिले आहे. यातील अनेक लाभार्थ्यांची पहिल्या टप्प्यातील अनुदान घेऊन शौचालय बांधण्यास सुरवात केली असून काही लाभार्थ्यांची शौचालये पुर्ण देखील झाली आहे.

परंतू 1 हजार लाभार्थ्यांनी पहिल्या टप्यातील 6 हजार रुपये घेवून वर्ष होवून देखील शौचालय बांधले नसल्याचे मनपाच्या निदर्शनास आहे.

शौचालये न बांधणार्‍यांना लाभार्थ्यांना मनपाने सुमारे तीन वेळा नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. परंतू तरी देखील लाभाथ्यार्ंनी शौचालये बांधलेले नाही.

मनपाचे अनुदान लाटणार्‍या 91 लाभार्थ्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान लाटणार्‍यांपैकी काही जणांनी अनुदान मनपाला परत केले असून काहींनी मात्र शौचालयांच्या कामाला तात्काळ सुरुवात केली आहे.

600 लाभार्थ्यांना अंतिम नोटीस
शौचालयासाठी पहिल्या हप्तातील सहा हजार रुपये घेवून ही काम न करणारे हजार लाभार्थी होते. त्यापैकी 91 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

तर काहींनी अनुदान परत केले तर काहींनी शौचालयाचे बांधकामाला सुरवात केली. परंतू 600 लाभार्थ्यांनी अजून पर्यंत बांधकाम करण्यास काहीच हालचाली केली नाही. त्यामुळे त्यांना मनपा अंतिम नोटीस देण्याचे काम सुरू केले आहे.

अन्यथा गुन्हा दाखल होणार
अंतिम नोटीस मिळाल्यावर सात दिवसात जर लार्भार्थ्याने बांधकाम सुरू केले नाही. तर या लार्भार्थ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे नोटीसमध्ये मनपा प्रशासनाने नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

*