बडतर्फ कर्मचार्‍यांना सेवेत घेण्यासाठी पुर्नविचार करा !

0

जळगाव । महापालिकेतील कर्मचार्‍यांना राजकीय दबाव, विना परवानगी गैरहजर राहणे, उशीरा येणे ही कारणे दाखवून आयुक्तांनी बडतर्फ केले होते.

आयुक्तांनी केलेली ही कारवाई कर्मचार्‍यांवर अन्यायकारक आहे. वरिष्ठांनी स्वतःचा बचाव करून कर्मचार्‍यांचा बळी दिलेला असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

त्यामुळे बडतर्फ कर्मचार्‍यांबाबात पूर्नविचार करुन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा विचार प्रशासनाने करण्याची मागणी त्यांनी शामाप्रसाद उद्यानात झालेल्या बैठकीत केली.

मनपातील बडतर्फ कर्मचार्‍यांची शामाप्रसाद उद्यानात बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत आयुक्तांची दिशाभूल करुन वरिष्ठ अधिकार्‍यांनी बडतर्फ केलेल्या कर्मचार्‍यांवर विविध कारणे दाखवून ठपके ठेवले होते.

परंतू याबाबत चौकशी करुन दोषी अढळलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षीत होते. परंतू तसे झाले नाही. बडतर्फ केल्याने गरीब कर्मचार्‍यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे.

कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे त्यांनी पालपोषण कसे करावे असा प्रश्न आता कर्मचार्‍यांना पडला आहे. त्यामुळे बडतर्फ करण्यात अलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत विचार प्रशासनाने घ्यावा.

तसेच कर्मचर्‍यांचा व कुटूंबातील व्यक्तिंचे काही बरेवाईट झाल्यास मनपा प्रशासनाचे प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अस्थापना अधिकारी जबाबदार राहणार असल्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला.

यावेळी मंगला ठाकूर, रमेश कोळी, हिराबाई कोळी, अनिता सपकाळे, इक्बाल खान उस्मान खान, मोतीलाल सपकाळे, विक्रम पाटील, रामचंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह बडतर्फ कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*