व्यापार्‍याच्या बॅगेतून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास करणार्‍याला सहा तासात अटक

0

जळगाव । नवीन बसस्थानकाच्या परिसरातून व्यापार्‍याच्या बॅगेतून सव्वातीन लाखांचे दागिने लांबविणार्‍या संशयितास जिल्हापेठ पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासात मुद्देमालासह अटक केली आहे. या संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परभणी जिल्हयातील मानवत येथील सोन्या चांदीचे व्यापारी कपिल सुधाकर उदावंत हे दि.5 रोजी जळगावातील सराफ बाजारातील नवलखा ज्वेलर्स येथे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते.

त्यांनी नवलखा ज्वेलर्समधून नेकलेस, कानातले टॉप्स, पेंडल, आयरिंग असा 107 ग्रॅम वजनाचे 3 लाख 22 हजार 500 रुपयांचे दगिने खरेदी केले.

त्यानंतर कपिल उदावंत हे मानवत येथे जाण्यासाठी सायंकाळी 6 वाजता नवीन बसस्थानकावर आले. यावेळी त्यांना शौचालयास जाणे असल्याने त्यांनी त्यांच्याजवळील सोन्याच्या दागिन्यांची बॅग बसस्थानकावरील शौचालयातील असलेल्या कॅबीनजवळील खुर्चीजवळ ठेवली.

त्यानंतर बाहेर आल्यावर उदावंत यांना खुर्चीजवळ ठेवलेली बॅग दिसून आली नाही. तसेच खुर्चीजवळील संबंधित व्यक्ती देखील त्याठिकाणी दिसून आला नाही.

उदावंत यांनी बाहेर येवून बसस्थानक परिसरात त्यांचा शोध घेतला असता, तो व्यक्ति दिसून न आल्याने त्यांनी बसस्थानकावरील पोलिस कर्मचार्‍यांना माहिती दिली.

त्यानंतर कपिल उदावंत यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला येवून पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर पोनि गायकवाड यांनी पोलिस कर्मचारी राजेंद्र मेंढे, अल्ताफ पठाण, रविंद्र नरवाडे यांना संबंधीत व्यक्तिचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

त्यानंतर पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड याच्या गुन्हे शोध पथकातील पीएसआय गजानन राठोड, पाहेकॉ. भास्कर पाटील, रविंद्र तायडे, मधुकर पाटील,तुषार जावरे, रविंद्र नरवाडे, राजेश मेंढे, अल्ताफ पठाण,महेंद्र बागुल, ललीत पाटील, जगन सोनवणे, रवि वंजारी, नाना तायडे, शेखर जोशी यांनी सापळा रचून शौचालया ठिकाणी साफसफाई करणारा कर्मचारी विजय जहांगीर तडवी वय 38 रा. हरिविठ्ठल नगर याला रात्री 1.30 वाजता अटक करण्यात आली.

त्याच्याकडून बॅगेतील 3 लाख 22 हजार 500 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. या संशयितास न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*