…तर संशोधन कार्याला बसणार खिळ ?

0
पंकज पाटील  | जळगाव | दि. ६  :  वरीष्ठ महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी युजीसीने नेट सेट असणे अनिवार्य केले आहे. तर पीएचडी केवळ इंन्क्रिमेटसाठी ठेवण्याचा युजीसीचा पर्याय संशोधनाला खिळ देणारा ठरणार आहे.
याचाच विपरीत परिणाम की काय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षापासून पदवीप्रदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते पीएचडी धारकांना व्यासपीठावरून पदवी प्रदान करणे बंद केले आहे. ही बाब पाच वर्ष संशोधन करणार्‍या संशोधक विद्यार्थ्यांना सापत्न वागणुक देणारी ठरत आहे.

पदवी मिळविणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. तर संशोधन करून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएचडी ही पदवी मिळवून वरिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यापीठात, परिसंस्थांमध्ये प्राध्यापक होण्याचे ध्येय संशोधक विद्यार्थ्याचे असते.

युजीसीच्या नव्या नियमानुसार ज्या पदव्य्ाुत्तर पदवीधारक विद्यार्थ्यास पीएचडी करावयाची असेल त्याने सर्वप्रथम पीएचडीची पुर्व परिक्षा (पेट) उर्तिण होणे गरजेचे असते. पेट परिक्षेनंतर सहा महिन्यांचा कोर्सवर्क असतो. हा कोर्सवर्क पूर्ण करून त्याची परिक्षा घेतली जाते.

या परिक्षेत पास झाल्यानंतरच संशोधक विद्यार्थ्याचा पीएचडीचा प्रवेश कन्फर्म केला जातो. प्रवेश कन्फर्म झाल्यानंतर संशोधक विद्यार्थ्याने त्याच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली विहीत मुदतीत म्हणजे ५ वर्षात संशोधन पूर्ण करून त्याचा संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर करायचा असतो.

सादर केलेल्या प्रबंधाच्या काही प्रति या राज्याबाहेर असलेल्या त्या त्या विषयाच्या प्राध्यापकांकडून तपासून घेतला जातो. त्यांचे अहवाल आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा अंतिम व्हाया ( तोंडी परिक्षा) दुसर्‍या तज्ज्ञ प्राध्यापकांसमोर होतो. यात तो यशस्वी झाला तर त्याला पीएचडी ही पदवी जाहीर केली जाते.

पदवीप्रदान समारंभांत सापत्न वागणुक

पदवी व पदव्युत्तर पदवीत विद्यापीठातून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना विविध दात्यांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपदक पदवी प्रदान सोहळ्यात सन्मापूर्वक मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर बोलावून प्रदान केली जाते. यासोबतच पीएचडी प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांनाही याच सोहळ्यात दिली जात होती.

परंतू गेल्या चार वर्षापासून पदवीप्रदान सोहळ्यात केवळ सुवर्णपदक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचाच मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जातो. पीएचडीधारकांना व्यासपीठावर बोलावले जात नाही. यामुळे पीएचडीधारक संशोकांमध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे.

… तर संशोधन कार्यच होईल बंद

युजीसीसह विद्यापीठांनी पीएचडीधारकांना अशीच सापत्नपणाची वागणुक देणे सुरूवच ठेवले तर येत्या काही वर्षात संशोधन कार्य करण्यास विद्यार्थी तयार होणार नाहीत. परिणामी संशोधन कार्यास खिळ बसणार आहे.

पीएचडीधारक उरले केवळ फोटोसेशनपुरताच

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर गेल्या चार वर्षापर्यंत पीएचडीधारकांना पदवीप्रदान सोहळ्यात व्यासपीठावर सन्मानपूर्वक बोलावून पदवी प्रदान केली जात होती. परंतू गेल्या चार वर्षापासून केवळ सुवर्णपदक प्राप्त करणार्‍यांनाच व्यासपीठावर बोलावले जाते.

तर पीएचडीधारकांना पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाने सुरू केलेल्या काऊंटरवरून घ्यावी लागते. पदवी प्रदान समारंभ संपल्यानंतर सुवर्णपदक धारकांचा समुह फोटो मान्यवरांसोबत काढला जातो. त्यानुसार पीएचडीधारकांना केवळ फोटोपुरताच महत्व देण्यात येत आहे. पाच वर्षाचे संशोधन केवळ एका फोटोपुरता मर्यादीत केले गेले आहे.

LEAVE A REPLY

*