उपखेड येथे महिेलेवर बिबट्याचा हल्ला आरडाओरड केल्याने जीव वाचला

0
चाळीसगाव | प्रतिनिधी : तालुक्यातील उपखेड येथे शेतता कापुस वेचणी करणार्‍या महिलेला नरभक्षक बिबट्याने टार्गेट करत समोरून हल्ला केला. बिबट्याचा हल्ला होत असतांनाच सोबत कापुस वेचणी करणार्‍या महिलांनी आराडाओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे.

बिबट्याच्या या हल्ल्यात महिलेच्या गळ्याला व हाताला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून त्याना शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गायत्री सुरेश पाटील (३८) या दुपारी शेतात महिलां सोबत कापुस वेचणी करत होत्या. तेथे आधीपासून धबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने समोरुन हल्ला केल्यामुळे गायत्री ह्या सावध झाल्या.

तसेच सोबत कपाशी वेचणी करणार्‍या पाच ते सहा महिलांनी व पुरूषांनी देखील आरडा-ओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. बिबटयाच्या हल्ल्यात मात्र महिलेच्या गळ्यावर व हातावर गंभीर जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*