जळगावात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : मुंबई, जळगाव, भुसावळ रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मनपा समोरील विकास बिर्ला यांच्या विकास मशिनरी या रेल्वे तिकीट काढणार्‍या एजंटचा तिकीटांचा काळाबाजार रेल्वे पोलीसांनी दि.९ एप्रिल रोजी उघड केला होता.

आज पुन्हा जळगावातील बालाजी पेठमधील एकाला संशयीत म्हणुन मुंबई, जळगाव, भुसावळ पोलीसांनी संयुक्तीक कारवाई करीत पकडले. त्यामुळे रेल्वे बुकींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील नवीपेठमध्ये राहत असलेल्या विकास केदारनाथ बिर्ला यांच्या जळगाव मनपासमोर निखील एजन्सी दुकानामध्ये रेल्वेचा आयपी बदलवुन बनावट तिकट चढ्या भावाने विकले गेल्याने त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर जप्त करण्यात आले आहे.

यावेळी सुमारे ५१ हजार ५०० रुपयांची २४ तिकीटे जप्त करण्यात येवुन त्यातील काही तिकीटे रद्द केली होती. दरम्यान आज पुन्हा शहरातील बालाजीपेठमध्ये मुंबई, जळगाव व भुसावळच्या पथकाने संयुक्तीपणे कारवाई केली. यामध्ये मयुर सोनी यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून झेरॉक्सचे मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, संशयास्पद वाटणारा डाटा, काऊंटर व करंट असे सुमारे ८ ते १० तिकटे जप्त करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता अचानक मयुर सोनी यांच्या बालाजी पेठमधील दुकानावर छापा टाकण्यात आला.

चढ्या भावाने तिकटांची विक्री

मयुर सोनी ह्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डाटा वरुन जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांची दिवसभर आयटी तज्ञांसमोर पोलीसांकडून चौकशी सुरु होती. सोनी याने स्वतःच्या लॉगिंकवर दुसर्‍याचा आयडी तयार करुन चढ्या भावाने तिकट विक्री करीत केली असल्याची काही महत्वाची धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले असल्याचे सांगत त्यांच्याकडून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येणार असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

रेल्वे पोलीसांची संयुक्त कारवाई

जळगाव शहरामध्ये बनावट आयडी तयार करुन प्रवाश्यांना वाढीव दराने आरक्षीत तिकीट उपलब्ध करुन देत असल्याची माहिती मुंबई येथील मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल क्षिरसागर यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी भुसावळ वाणिज्य विभागाचे उपनिरीक्षक प्रशांत ठाकुर, सीआयबी व आरपीएफ भुसावळचे अतुल टोके, जळगाव रेल्वे पोलीसाचे पोनि. गोकुळ सोनुने यांना याबाबत माहिती दिली.

त्यानुसार आरपीएफचे पोउनि. के.बी.सिंग, पोउनि. फरियाद खान, पोहेकॉ डी.के. सोनवणे, निलेश अडवाल, रियान अहेमद,नाना सोनवणे, सुनिल बोरसे, आसाराम गव्हाणे यांच्यासह शनिपेठ पोलीस ठाण्यातील जे.के.शेख, अमित बाविस्कर या पथकाने जळगावातील बालाजी पेठमधील रथचौकातील मयुर बालुलाला सोनी (वय २५) यांच्या तिरपुती टुर्स ट्रॅव्हस् आणि रेल्वे ई- टिकट या दुकानावर अचानक छापा टाकला.

लॅपटॉप, प्रिंटर हस्तगत

मयुर सोनी यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर हस्तगत करण्यात आले. सोनी याच्यावर सीआयबी व आरपीएफ भुसावळ विभागाचे आरक्षक कैलास बोडके यांच्या फिर्यादीवरुन रेल्वे अधिनीयम १४३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. उद्या भुसावळ न्यायालयात सोनी याला हजर करण्यात येईल.

२३ हजाराचे तिकीटे जप्त

मयुर सोनी यांच्या दुकानातून आरक्षण खिडीकीतील ४ तिकीटे जप्त करण्यात आली. यामध्ये भुसावळ ते पांनपुरा, जळगाव- वर्धा, जळगाव- सीएसटी, जळगाव-पांनपुरा असे २ हजार ९९५ रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली.

तसेच २० हजार ७० रुपयांची सात ई- तिकटे असे एकुण २३ हजार ६५ रुपयांची तिकटे जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ११ तिकीटे रद्द करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

*