भोळे महाविद्यालयात रसायनशास्त्राची राष्ट्रीय परिषद उत्साहात

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने प्रायोजित केलेली रसायनशास्त्राची राष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन मांटुगा मुंबई येथील इन्स्टिट्युट ऑङ्ग केमिकल टेक्नॉलॉजी मधील शास्त्रज्ञ प्रा.डॉ.अनंत कापडी यांचे हस्ते झाले.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सेवाकार्य केलेले शास्त्रज्ञ आणि सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील प्रा.डॉ.के.जे.पाटील प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.ङ्गालक आणि परिषद प्रमुख प्रा.डॉ.जी.पी. वाघुळदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रा.डॉ.अनंत कापडी यांनी सांगितले की, आपण शिक्षक आणि संशोधक या व्यक्तिरेखांमधून जीवनाच प्रवास सुरू असतांना अध्यापनाच्या पलिकडे समाजात वावरतांना आपली भुमिका काय असावी हे आपल्याला निश्‍चित माहिती असली पाहिजे तेहा आपण विज्ञान, माणूस आणि भविष्यातील विकास यांची सांगड घालू शकतो.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा.डॉ.के.जे.पाटील यांनी रसायन शास्त्राच्या विविध शाखा कशा पध्दतीने एकमेकांपासून वेगळ्या आहेत हे विविध दैनंदिन जीवनातील उदाहरणे देवून स्पष्ट केले. तसेच रसायन शास्त्राच्या विविध शाखांचा मानवी समाजाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल हे सांगुन विज्ञानाचा तंत्रसुध्द अभ्यास हा मेडिटेशन पेक्षाही उपयुक्त असतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ.आर.पी. ङ्गालक यांनी देशभरातून आलेल्या शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्राध्यापकांचे स्वागत करून परिषदेला शुभेच्छा दिल्या. रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन संधीचा ही प्राचार्य डॉ. ङ्गालक यांनी आढावा घेतला.

प्रसंगी कला, विज्ञान महाविद्यालय भालोदचे प्राचार्य डॉ.ए.एस. कोल्हे उपस्थित होते. परिषद प्रमुख प्रा.डॉ.जी.पी. वाघुळदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रा.डॉ.आर.बी. ढाके यांनी आभार मानले.

परिषदेमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रमुख बिजभाषणात बोलतांना प्रा.अनंत कापडी यांनी पॅलॅडियम धातूवरील उच्च दर्जाच्या संशोधन आणि त्याचे वैज्ञानिक क्षेत्रामधील संशोधन अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादर करित असतांना संशोधन करित असतांना संशोधक विद्यार्थ्याची मानसिकता कशी असावी आणि त्याने उच्च दर्जाचे संशोधन करित असतांना कोणकोणत्या प्रकाराची काळजी घ्यावी, हे उदाहरणांसह स्पष्ट केले.

भोजनानंतरच्या सत्रात १५ सहभागी प्राध्यापकांनी आपले शोध निबंध ओरल स्वरूपात तर ४५ प्राध्यापकांनी आणि संशोधक विद्यार्थ्यांनी पोस्टर स्वरूपात सादर केले. या सत्रांचे अध्यक्ष म्हणून कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.एस. राजपूत, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा.डॉ.एम.के. पटेल आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय रावेरचे प्रा.अविनाश सोनार यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.ए.आर.कापडी यांनी संशोधक विद्यार्थ्यांना इन्स्टिट्युट ऑङ्ग केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथून सर्व प्रकारच्या प्रमाणीकरणाची मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तर प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत यांनी उत्कृष्ठ आयोजनाबाबत महविद्यालयाचे कौतुक करित अशा पध्दतीचे आयोजन, नियोजन आणि मार्गदर्शनातून संशोधकांना प्रेणा मिळते असे मत व्यक्त केले.

सादरीकरण केलेल्या प्राध्यापकांपैकी प्रत्येकी दोन शोधनिबंधांना बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड देवून गौरविण्यात आले. त्यापैकी पोस्टर प्रेझेंटेशनसाठी भालोद महाविद्यालयामधून प्रा.राकेश चौधरी, ङ्गैजपूर महाविद्यालयाच्या प्रा.पल्लवी भंगाळे तर ओरल प्रेझेंटेशनसाठी शहादा महाविद्यालयाचे प्रा.मिलिंद पाटील आणि भोळे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दयाधन राणे यांना प्रा.डॉ.अनंत कापडी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

या परिषदेसाठी देशभरातून १३० प्राध्यापक आणि संशोधकांनी सहभाग घेतला. सुत्रसंचालन प्रा.माधुरी पाटील व प्रा.अंजली पाटील यांनी केले.

यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आर.पी. ङ्गालक यांचे मार्गदर्शनखाली परिषद प्रमुख प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, समन्वयक प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.डॉ. कांता भाला, प्रा.निर्मल वानखेडे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ. शोभा चौधरी, प्रा.डॉ.संजय धर्मा चौधरी, प्रा.संगिता धर्माधिकारी, प्रा.ए.आर. सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.एस.एल. पाटील, प्रा.डॉ.आर.डि. भोळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*