चोपडा तालुक्यातील उत्तमनगरला महसुली दर्जा : आ.प्रा. सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंत्रालयातील बैठकीत निर्णय

0
चंद्रकांत पाटील  | चोपडा :  तालुक्यातील उत्तमनगर या आदिवासी गावाला महसुली दर्जा मिळावा यासाठी गेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेतील चोपड्याचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तारांकित प्रश्न उस्थित केला होता. याबाबत दि. ५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उत्तमनगर या आदिवासी गावाला महसुली दर्जा देण्याबाबत मान्यता देण्यात आली.

दि.५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तालुक्यातील उत्तमनगर या आदिवासी वस्तीस महसुली दर्जा देणे संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे आमदार सुभाष पाबने यांचेसह पाणीपुरवठा विभागाचे कक्षाधिकारी व्ही.डी. ङ्गुलसुंदर,आर.ए.साबणे, मुख्य अभियंता व्ही. आर.गजभिये, चोपड्याचे तहसीलदार दिपक गिरासे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे.पी. पाटील, वन,महसूल,जिल्हा परिषद, ग्रामविकास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ८३६९१ मध्ये उत्तमनगर या आदिवासी वस्तीला महसुली दर्जा देऊन मूलभूत सोयी सुविधा देणेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना शासनाकडून उत्तमनगरला महसुली दर्जा देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते.

त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी प्रशासनाच्या वतीने उत्तमनगरला वन हक्क कायदा अंतर्गत कलम ३ (१) क नुसार गावास गावठाण मंजुरी करिता दावा करण्यात आला आहे. हा दावा उत्तमनगर येथील कक्ष क्रमांक २८३ क्षेत्र ४ हेक्टर इतके उपविभागीय समितीने मंजूर करुन जिल्हास्तरीय समितीकडे दि.१३ सप्टेंबर रोजी पाठविले होते.

तसेच दि.१३ एप्रिल रोजी चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्ङ्गत उपविभागीय अधिकारी अमळनेर यांचेकडे या पाड्यास पेसा गावाचा सादर केला होता. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे पाठविला असल्याची तारीखवार टिपणी सादर केली.

दि. ५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्याबाबत चर्चा होऊन उत्तमनगर या आदिवासी पाड्यास महसुली गावाचा दर्जा देण्या संदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना बैठकीत ङ्गोन लावून त्रुटींची तात्काळ पुर्तता करून महसुली गावाचा दर्जा देण्याच्या सूचना केल्यात.

LEAVE A REPLY

*