विजय मल्ल्यांनी मागितले भारत सरकारकडे फसवणूकीचे पुरावे

0

मुंबई : नऊ हजार कोटी रूपयांच्या कर्ज बुडवल्याप्रकरणाचे भारत सरकारने पुरावे द्यावेत. असे कोणतेही पुरावे भारताकडे नाही. असा दावा विजय मल्ल्या यांच्या वकिलांनी लंडन येथे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात केला.
मद्यसम्राट विजय मल्याला कर्ज बुडविल्याप्रकरणी भारताच्या स्वाधीन करण्याच्या मागणीबाबत ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

काय म्हणाले भारताचे वकिल

भारताचे वकिल मार्क्स समर यांनी न्यायालयात सांगीतले की, विजय मल्या यांच्यावर फसवणूकीचा खटला सुरू आहे. त्यासाठी त्याला उत्तर देण्यासाठी भारताच्या स्वाधीन करणे गरजेचे आहे.

काय म्हणाले मल्ल्याचे वकिल

भारताच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर विजय मल्ल्याच्या वकिलांनी युक्तीवाद करतांना सांगीतले की विजय मल्ल्या यांच्यावर भारत सरकारने ठेवलेल्या फसणवूकीच्या आरोपाबाबत भारताकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांना भारताच्या स्वाधीन करण्याबाबत देणारे पुरावे कुचकामी असल्याचा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

*