चैत्यभूमीवर मनामनात गुंजला ‘भिमराया घे तुझ्या भक्तांची ही वंदना’

0
नागपुर : ओखी वादळाच्या तडख्याला न जुमानताही येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो भीम सैनिकांनी नतमस्तक होत भिमरायांना अभिवादन केले.

गेल्या दोन दिवसापासून भारताला ओख्खी वादळाचा तडाखा बसत आहे. नागपुरसह मुंबईकरांना पावसाचा व वेगवान वार्‍यांचा सामना करावा लागत आहे. ओख्खी वादळाचा धोका टळला असला तरी पावसाचा धोका अजुन टळलेला नाही. अशाही प्रतिकूल स्थितीत लाखो भिमसैनिकांनी काल दि. ५ पासूनच चैत्यभूमीवर हजेरी लावत आपल्या आराध्य दैवताला अभिवादन केले.

मुंबईतही हजारो भिम सैनिकांनी केले अभिवादन

दरम्यान मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात कालपासून हजारो भिम सैनिकांनी हजेरी लावत आपल्या आराध्य दैवतास वंदन केले. ओखी वादळ व पावसामुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे.

भिमसैनिकाच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे उभारण्यात आलेले तंबूही पावसाने भिजले. तर काही मंडप वार्‍यामुळे कोसळले.अशाही स्थितीत भिमसैनिकांनी महामानवास वंदन केले.

LEAVE A REPLY

*