मंत्रालयाच्या आवारात महिन्याभरात होणार खतनिर्मिती प्रकल्प

0
मुंबई : मंत्रालयाच्या उपहारगृहात निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मंत्रालयाच्या आवारातच खतनिर्मिती प्रकल्प तयार करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्याची मागणी मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई  महापालिकेकडे केली आहे.

मंत्रालयाच्या आवारात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यात येत आहे. मंत्रालयातून वेस्टेज कागदांची रद्दी ठेकेदाराकडून वाहून नेली जाते. मात्र उपहारगृहातील ओला कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची समस्या आहे.

यापूर्वी हा कचरा महापालिका नेत होती. यासाठी महापालिका यंत्रणेला मोठा खर्च येत होता. हा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठे अपार्टमंेंट, हॉटेल, रूग्णालये यांना त्यांच्या जागेतच खत निमिर्ती प्रकल्प उभारण्याची सक्ती केली आहे. या सक्तीसोबतच येथील ओला व कोरडा कचरा २ ऑक्टोबरपासून उचलण्यात येत नाही. हाच नियम महापालिकेने मंत्रालयालाही लागु केला आहे.

दंड माफ करण्यासह मुदतवाढीची मागणी

महापालिकेने खतकचरा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रालय व्यवस्थापाकांना कळविले होते. तो विहीत मुदतीत न उभारल्याने महापालिकेने मंत्रालयाला दंड ठोठावला. त्यावर मंत्रालयाच्या बांधकाम विभागाने सदर दंड माफ करण्यासह प्रकल्प उभारण्यासाठी मुदत मागीतली होती. त्यानुसार मंत्रालयाला ३ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*