अयोध्याप्रकरणी सुन्नी बोर्डाला धक्का

0

नवी दिल्ली । अयोध्या प्रकरणी सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पुढे ढकलावी, अशी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेली विनंती फेटाळत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 8 फेब्रुवारी 2018 ही तारीख आज निश्चित केली.

दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान जवळपास पावणेदोन तास जोरदार युक्तिवाद रंगला. अयोध्या प्रकरणी अद्यापी कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही.

या प्रकरणात कोर्टाच्या निकालाचे देशभरात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या बाबी लक्षात घेता या प्रकरणी घाईघाईने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने करण्यात आला.

मात्र सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी यावर नाराजी व्यक्त केली. सर्व पक्षकार जानेवारीत सुनावणीसाठी तयार झाले असताना आता सुनावणी जुलै 2019 नंतर घ्या असे काय म्हणू शकता. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

LEAVE A REPLY

*