रा.काँ.महानगरप्रमुखासह 150 हॉकर्सविरुद्ध गुन्हा

0

जळगाव । शहरातील फुले मार्केटमधील हॉकर्सने राष्ट्रवादीचे महानगरप्रमख नीलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता.

मोर्चावेळी नीलेश पाटील यांच्यासह हॉकर्सने पोलिसांशी हुज्जत घातल्याने तसेच रस्त्यावार बसून रस्ता बंद करुन पोलिसांच्या आदेशाचे पालन न केल्याने राष्ट्रवादीचे महानगरप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह 150 हॉकर्सविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरपलिकेकडून फुले मार्केटमध्ये अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या निषेधार्थ फुले मार्केटमधील हॉकर्सने राष्ट्रवादीचे महानगरप्रमख नीलेश सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुले मार्केटपासून महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढला होता.

मोर्चावेळी नीलेश पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्यां हॉकर्सने पोलिसांशी हुज्जत घालून महानगरपलिकेसमोर रस्त्यावर बसून रस्ता रोखत पोलिसांनी दिलेल्या वाजवी आदेशाचे पालन न करता अवाज्ञा केली.

त्यामुळे पोलीस कर्मचारी पो.हे.कॉ.भालचंद्र देसले यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीने महानगरप्रमुख नीलेश पाटील, हॉकर्स नंदू पाटील, जितेंद्र उर्फे जितू वाणी, बापू कोळी, नंदू महाजन, रवींद्र महाजन, मनोज चौधरी, रवि चौधरी, फारुख अहेलकार, रवि उर्फ पिंटू पाटील, इरफान शेख, गोंविदा कुंभार, तौसिफ पठाण यांच्यासह 100 ते 150 जणांविरुध्द गु.र.न.186/2017 भा.दं.वी.कलम 341, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि.आशिष रोही करीत आहे.

LEAVE A REPLY

*