जि.प.च्या विकासकामांना लागला ब्रेक !

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या सन 2017-18 च्या विकास कामांच्या 230 कोटीच्या आराखड्याला नियोजन मंडळाने मंजुरी दिली आहे.

त्यापैकी 9 महिन्यात विविध हेडवरील 30 टक्के कपात करून व स्पिल् ओव्हर वगळता केवळ 44 कोटी जिल्हा परिषदेला मिळणार आहे. यात 9 महिने होवून देखील केवळ साडे आठ कोटीची झाली आहे.

जि.प.च्या पदाधिकार्‍यांकडून कामांंचे नियोजन होत नसल्याने तसेच अधिकारी व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकास कामे संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या थंडावलेल्या विकास कामांना विभागीय आयुक्त महेश झगडे गती देतील का? याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे उद्या दि.6 रोजी जिल्हा परिषदेत येत असून ते विविध योजनांचा आढावा, केलेला खर्च, अपूर्ण कामे यासह विविध विषयांचा आढावा घेणार आहे.

जिल्हा परिषदेचे पदधिकारी व आधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहे. जि.प.ला जिल्हा नियोजन मंडळाकडून आलेल्या निधीतुन स्पिल ओव्हर व 30 टक्के कपात केली असता 44 कोटीचा निधी जि.पकडे आहे.

त्यापैकी नऊ महिन्यात विविध हेडवरील 8 कोटी 50 लाखाच्या कामांना डीपीडीसीकडून मान्यता मिळाली आहे.कामेच ठरविली जात नसल्याने निधी खर्च बाबत आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

आतापर्यंत पशुसंवर्धनच्या सर्वसाधारण योजनेतुन 21 लाख, सिंचनचे 8 कोटी 78 लाख व नाविन्यपुर्ण योजनेचे 39 लाख 31 हजारच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

जि.पचा निधी खर्च झालेला नाही. नऊ महिने होवून प्रशासनाने पत्र देवून सोपस्कार पार पाडला आहे. मात्र प्रशासनाकडून पदाधिकार्‍यांची बैठक घेवून हा प्रश्न सोडविला नाही. समन्वयाची भुमिका घेण्यास कुणी ही तयार नसल्याने निधी खर्चाचे घोंगडे सुटत नसल्याचे दिसुन येत आहे.

पदाधिकारी व अधिकार्‍यामध्ये समन्वयाचा अभाव
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा प्रकार नुकताच निर्देशनास आला आहे. बांधकाम विभागात गेल्या 4-5 दिवसांपूर्वी जि.प सदस्याचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागात येवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली होती.

याप्रकाराचा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला होता. दरम्यान या प्रकारबाबत जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

*