ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट बांधवानी रणशिंग फुंकले : राज्य संघटना कार्यकारीणीच्या बैठकीत निर्णय

0
जळगाव |  प्रतिनिधी :  राज्यात बेकायदेशीररित्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फॉर्मसी व केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटुंब कल्याण विभागाने प्रसिध्द केलेल्या नोटीसाच्या विरोधात राज्य संघटनेच्या बैठकीत केमिस्ट बांधवांनी रणशिंग फुंकले असून ३० मे रोजी एकदिवसीय बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यकारीणी बैठक केमिस्ट भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. जगन्नाथ शिंदे होते.

यावेळी राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर, कोषाध्यक्ष वेजनाथ जागुष्टे, संघटन सचिव विनय श्रॉफ, जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे, जिल्हा सचिव अनिल झंवर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्य संघटनेच्या बैठकीला प्रत्येक जिल्हयातील अध्यक्ष व सचिव व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात देशातील ८ लाख तर राज्यातील ५५ हजार केमिस्ट एकदिवसीय बंदात सहभागी होणार आहे.

देशाने इतर देशाची बरोबरी करतांना उणीवांची गंभीर दखल घेवून त्यावरील उपाय याचा विचार करूनच ऑनलाईन फार्मसी व ई पोर्टलसारख्या बाबींचा विचार करणे गरजचे आहे. परकीय चलनाची गुंतवणुक अथाव स्पर्धात्मक व्यवसायिक व्यवस्था यापेक्षाही सामान्या जनतेचे आरोग्य जास्त महत्वपूर्ण आहे.

त्यामुळे औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसीला विरोध दर्शविण्यासाठी दि.३० रोजी एकदिवसीय बंदचा निर्णय घेतला आहे. राज्य कार्यकारीणी बैठक यशस्वीसाठी जिल्हाअध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, महेंद्र महाजन, ब्रजेश जैन, शामकांत वाणी, सुनिल महाजन, धनंजय तळेले, श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाखले, रुपेश चौंधरी, संदीप बेदमुथा , प्रदीप देशमुख, शैलेश राठोड, संजय तिवारी, नरेंद्र पाटील, दिनेश चौधरी, सचिन अग्रवाल, अमित चांदीवाल यांच्यासह तालुका अध्यक्ष व सचिव यांनी परिश्रम घेतले.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाची भुमिका

राज्यात ई- फार्मसीच्या माध्यमातून बेकायदशीर व्यवसाय सुरु असून याद्वारे नार्कोटीक्स ड्रग्ज, झोपेची औषणी, गर्भपाताच्या गोळया, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकेदायक औषधांची विक्री सुरु असल्याचे शासनाच्या निर्दशनास आणुन दिले आहे.

उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान ऑनलाईन औषणी विक्रीबाबत अनेकवेळा गभीरबाबींची साशंकता व्यक्त केली आहे. राज्य व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सरकार देशात ई-फार्मसी व ई- पोर्टल लागू करण्याची योजना राबवित असल्याने देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाची भुमिका घेतली आहे.

औषध विक्रेत्यांचा ऑनलाईन फॉमसीला विरोध

औषधांच्या दुष्परिणापासून सामान्य जनतेला वाचविणे, कमी दर्जाच्या , अप्रमाणित, डुप्लिकेट औषधांच्या शिरकावाची दाट शक्यता आहे, तसेच डॉक्टरांचया चिठ्ठीमुळे ऍन्टीबायोटीक्स, वेदनाशामक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळले, तसेच युवकांमध्ये नशेच्या औषधांच्या वापराचा धोका वाढेल त्यामुळे औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फॉर्मसीला विरोध दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

*