जि.प.बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी निविदा मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार पद्मालय कस्ट्रक्शनचे अतुल बाहेती यांनी जिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व शहर पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान आज सकाळी जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासह अतुल बाहेती यांनी शहर पोलिसात येवून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व वरिष्ठ सहाय्यक सी.एस.पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

बांधकाम विभागाने पाहिल्या निविदा न उघडता कुठल्याही कायद्यात बसत नसतांना परस्पर फेरनिवदी काढल्या.बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक सी.एस.पाटील व कार्यकारी अभियंता प्रदिप कापडणीस यांनी निविदा मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याने पद्मालय कस्ट्रक्शनचे अतुल बाहेती यांनी याबाबत जिल्हाधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व शहर पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान शहर पोलिसांनी तक्रारीबाबबत दिलेल्या अर्जाची चौकशी करूनच बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे, अतुल बाहेती यांना सांगितले.

LEAVE A REPLY

*