पोर्स्टर प्रदर्शनाद्वारे एड्स नियंत्रणासाठी जनजागृती

0

जळगाव । जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक नियंत्रण समिती, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि राष्ट्रविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्य पोस्टर्स प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

यावेळी जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, राष्ट्रविकास संस्थेचे कलेश्वर आमोदेकर, नवल पाटील, प्रमोद पाटील, भुषण पाटील, मुरलीधर बिरारी, अमोल सुर्यवंशी, संजय कापडे, निलेश पाटील, अमर पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*