सर्वांचाच हायटेक प्रचाराकडे कल

0

चेतन इंगळे ,मोदलपाडा । तळोदा नगरपालिका निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा सर्वच पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. यात शेकडो पोस्ट या मोबाईलवर येत असल्याने मतदारांना वैताग येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक साधनांचा वापर करून हायटेक प्रचाराकडे उमेदवारांचा कल आता दिसून येत आहे.

मध्यमक्रांती झाली तशी जनसंपर्काची साधनेही बदलली. पत्रे गेली आणि एसएमएस रूढ झाले. आता एसएमएसही मागे पडून सोशल मीडियाचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

जनसंपर्काला सर्वत्र महत्व असलेल्या निवडणुकीतही हा बदल झपाट्याने स्वीकारला गेला आहे. मात्र मतदारांची वयानुसार विगतवारी लक्षात घेऊन पारंपरिक साधनेही अद्याप टिकवून ठेवण्यात आली आहेत.

त्यामुळे एकीकडे स्क्रीनवर उमेदवार अथवा स्टार प्रचारकाचे आवाहन दाखवीत फिरणार्‍या डिजिटल व्हॅन आता सक्रिय झाल्या आहेत. तळोदा नगरपालिका निवडणुकीत सध्या संपूर्ण शहरामध्ये डिजिटल व्हॅनद्वारे प्रचार सुरू करण्यात आला आहे.

व्हॅनला जोडलेल्या स्क्रीनवर कधी महनीय व्यक्तींचे दृक्श्राव्य साधन संदेश प्रसारीत केले जातात. भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेद्वावारांतर्फे सुरू असलेला हा हायटेक प्रचार युवकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. दुसरीकडे मोठमोठे स्पीकर बसवून कर्कश आवाजातून रिक्शांद्वारे होणारा प्रचारही थांबलेला नाही.

नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष प्रचारात आघाडी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करत आहे. सर्व प्रभागातील मतदार यादी अद्यावत करून घेण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

मतदान केंद्रात किती मतदारांनी मतदान केले कोणाचे मतदान राहिले आहे यासंदर्भात देखील अ‍ॅप आले असून त्याचा सर्वच पक्ष वापर करतील असे दिसत आहे.

अनेक मतदारांचे दोन दोन प्रभागात मतदान आहे, अश्या मतदारांचे मतदान आपल्या प्रभागात कसे होईल याचा कार्यकर्ते अंदाज बांधत आहेत. बाहेरगावी असलेल्या मतदारांचा शोध घेऊन ते आपण कसे आणावे यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

*