कंडारीत 48 कोटींची विकास कामे

0

भुसावळ । तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अनु.जाती व नवबौध्द निवडक दलित वस्ती सुधारनिमित्त 48 कोटी 40 लाख रुपयांच्या कामांबाबत बैठक झाली.

या बैठकिला आ.संजय सावकारे, जळगावचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड, औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वास्तु विशारद शै.अ.गुळवेलकर, भुसावळ गट विकास अधिकारी एस.बी.मावळे, भुसावळ सा.बां.उपविभागाचे अभियंता व्ही.एस.मौर्य, भुसावळचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.यु.कुरेशी, आर.बी.साळुंके, एस.पी.लोखंडे, के.बी.बाविस्कर, कंडारी ग्रामविकास अधिकारी एस.एन.नारखेडे, भुसावळ पं.स.चे कनिष्ठ सहाय्यक जी.व्ही.एदलाबादकर उपस्थित होते.

बैठकीत कंडारी येथील 14 कोटी 68 लाख 95 हजार 840 रुपयांचे सामाजिक सभागृह तसेच वाचनालय, संगणक केंद्र, व्यायाम शाळा, महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

1 कोटी 39 लाख 16 हजार 448 रुपयांचे शौचालये आणि स्मशानभुमी, 7 कोटी 28 लाख 53 हजार 200 रुपयांचे अंतर्गत बी.टी.रोड, 2 कोटी 94 लाख 27 हजार 76 रुपयांचे काँक्रीट रोड, 1 कोटी 67 लाख 56 हजारांचे पेव्हींग ब्लॉक, 4 कोटी 60 लाख 20 हजारांचे रिटेनिंग वॉल, 20 लाख रुपयांचे बागकाम, वीजेच्या खांबांचे स्थलांतरणासाठी 5 लाख, भुखंडाचा विकासासाठी 50 लाख, बोअर वेल आणि पंप हाऊससाठी 30 लाख, 94 लाख 40 हजारांची संरक्षक भिंत, 3 कोटी 83 लाख 50 हजाराचे पावसाचे पाणी वाहुन नेण्यासाठी अर्धनळी, नाल्यांवर लादी साठी 56 लाख 64 हजार रुपये आदि कामांचा समावेश असून त्यासाठी 38 कोटी 98 लाख 22 हजार 564 रुपये खर्च अपेक्षीत आहे.

कामपुर्ण करण्यासाठी वीज वापर, विमा, खाजगी शिल्पकर आदि खर्च मिळून 48 कोटी 40 लाख रुपयांचे विकास काम होणार आहे.

LEAVE A REPLY

*