राम मंदिर व बाबरी मशिदीच्या सुनावणीस ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगीती

0
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चित व अयोध्या राम मंदिर व बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी ८ फेब्रुवारीपर्यंत घेण्यास मनाई केली आहे.

बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेला उद्या बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यान २०१९मध्ये लोकसभेच्या निवडणूका होत असल्याने या प्रकरणाची सुनावणी तोपर्यंत पुढे ढकलावी अशी विनंती सुन्नी वक्फ बोर्डाचे वकिल कपिल सिब्बल यांनी न्यायालयास केली होती. परंतूू ती न्यायालयाने फेटाळली.

अयोध्येत राम मंदिर तर लखनोत बाबरी मशिद बांधण्याची तोडगामय मागणी शिया वक्फ बोर्डाने केली होती. परंतू हे प्रकरण अतिशय संवेदनशिल असल्याने न्यायालयाबाहेर समजूतीने निकाली काढावा असे उच्च न्यायालयाने सुचविले होते.

परंतू योग्य समेट न झाल्याने हे प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे आले आहे. न्यायालयाने याची सुनावणी करण्यास ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.

LEAVE A REPLY

*