सीआयएसएफचा जवान जिल्ह्यातून बेपत्ता

0
जळगाव | प्रतिनिधी :  नवी दिल्ली येथे कार्यरत असलेल्या सीआयएसएफचा जवान जिल्ह्यातुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. याप्रकरणी नातेवाईंकासह रेल्वे पोलीसांनी जळगाव स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथील रहिेवाशी निलेश नाना पाटील (वय २६) हा तरुण गेल्या दोन वर्षापुर्वी सीआयएसएफमध्ये भरती झाले होते. नवी दिल्ली येथील सीआएसएफच्या कार्यालयात ते सेवा बजावितात.

दोन वर्षोपासून दिल्ली येथे कर्तव्य बजावित असलेले निलेश पाटील हे गेल्या वीस ते बावीस दिवसांपासुन रजा टाकुन आले होते. वेल्हाणे येथे गावी ते राहत होते. दरम्यान सुटी संपल्याच्या पूर्वी जवानाने सचखंड एक्सप्रेसने दिल्ली जाण्यासाठी दि. २१ रविवारचे तिकीट आरक्षीत केले होते.

एस-७ या आरक्षीत डब्यात त्यांनी क्रमांक २१ ची सीट आरक्षीत मिळाली होती. दिल्ली जात असल्याचे सांगून तो वेल्हाणे येथुन जळगाव रेल्वेस्थानकावर आले. दि.२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते जळगाव रेल्वे स्थानकावर पोहचले.

फलाट क्रमांक ३ वर त्यांनी सचखंड एक्सप्रेसची प्रतिक्षा केली.सचखंड एकस्प्रेस त्यादिवशी उशिरा धावत असल्याने ६.३५ च्या सुमारास आली. यावेळी निलेश गाडीत बसुन मार्गस्थ झाले. मोठे बंधु कमलेश पाटील यांना मोबाईल लावून गाडीत बसल्याची माहिती निलेशने दिली.

नंतर कमलेश पाटील यांचे निलेश याच्याशी ०६.५० वाजता शेवटचे बोलणे झाले.दरम्यान जवान निलेशचे वडील नाना पाटील यांनी मुलगा नेमका कुठपर्यत पोहोचला, हे जाणुन घेण्यासाठी सोमवार दि.२२ मे रोजी दुपारी फोन केला. यावेळी त्याच्याशी संपर्क झाला नाही. काही वेळानंतर मोबाईल बंद आला.

सीआयएसएफ कार्यालयाकडून तपासला वेग

निलेश पाटील हा घरुन निघुन कार्यालयात पोहचला नसल्याची माहिती मिळताच सीआयएसएफ कार्यालयातील अधिकार्‍यांनी वरीष्ठांना माहिती दिली. त्यांनी जवान निलेशचा शोधासाठी तपासाला गती दिली आहे.

नातेवाईकांनी लोहमार्ग पोलीसांशी

जवान निलेश बेपत्ता झाल्याने वडील नाना पाटील, मोठे भाऊ कमलेश पाटील यांच्यासह अन्य नातेवाईकांनी आज लोहमार्ग पोलीसांशी संपर्क साधला. दि.२१ पासुन निलेश पाटील बेपत्ता असल्याचा प्रकार कथन करीत नातेवाईकांकडून शोधुन ते मिळत नसल्याचे सांगत हरविल्यची तक्रार दाखल करण्याची विनंती केली.

तसेच दि.२१ मे सचखंड एक्सप्रेसच्या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याविषयी विनंती केली. त्यांनी लोहमार्ग पोलीसांनी सहकार्य केले.

सीआयएसएफ कार्यालयाकडून विचारणा

निलेश पाटील यांची रजा संपल्यावरही निलेश सेवेत दाखल झाले नाहीत? अशी विचारणा दिल्ली येथील सीआयएसएफ कट्रोल रूम कडून कुटूंबियांना करण्यात आली.

मात्र निलेश हा दि.२१ रोजी दिल्लीकडे निघाला असल्याची माहिती वडील नाना पाटील यांनी संबधीत अधिकार्‍यांना दिली.

LEAVE A REPLY

*