फक्त इन्क्रिमेंन्टपुरताच ‘पीएचडी’चा लाभ : विद्यार्थी संवाद पर्वात कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांची माहिती

0
पंकज पाटील |  जळगाव | दि. ५  :  वरिष्ठ महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून लागण्यासाठी नुसती पीएचडी उपयोगाची नाही. पीएचडीचा उपयोग केवळ इंन्क्रिमेट मिळविण्यासाठी व गाईडशिप मिळवण्यासाठी आहे. सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी नेट किंवा सेट होणे गरजेचे आहे. अशी माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी दिली.

महिन्याच्या पहिल्या व तीसर्‍या सोमवारी दुपारी कुलगुरू दालनात विद्यार्थ्यांना येणार्‍या विविध समस्या व अडचणीबाबत कुलगुरू विद्यार्थी संवाद पर्वाचे आयोजन करण्यात येते . त्यानुसार दि. ४ रोजी झालेल्या संवाद पर्वात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी कुलसचिव बी.बी. पाटील उपस्थित होते.

वरिष्ठ महाविद्यालयात नोकरीसाठी अनेक विद्यार्थी पीएचडी करत असतात. परंतू त्यांना पीएचडी होऊनही नेट सेट उत्तिर्ण होणे अनिवार्य आहे.

नेट सेटच का ?

नेट सेटला पर्याय म्हणून अनेक जण पीएचडीचा पर्याय निवड असतात. परंतू भारतभरात पीएचडीबाबत अनेक वाद विवाद निर्माण होत आहेत. त्यामुळे युजीसीने नेट सेट उत्तिर्ण होणे अनिवार्य केले आहे.

इन सर्व्हिसला लाभ

युजीसीच्या नियमानुसार ज्यांनी नेट, सेट, एमफिल केलेले असेल व त्यांची काही वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात सेवा झाली असेल त्यांना पीएचडीच्या पेट परिक्षेमधून सुट मिळते. त्यांनी नियमानुसार पीएचडी पूर्ण केली तर त्यांना इन्क्रिमेटसाठी त्याचा उपयोग होतो. त्याशिवाय पीएचडीचा अन्य कोणताही लाभ नसल्याचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगीतले.

नेट सेट आवश्यकच

पदव्युत्तर पदवी एम. ए. परिक्षा बी प्लस मध्ये उत्तिर्ण करून पीएचडीची पेट परिक्षा देत पीएचडी करणार्‍यांना नेट सेट उत्तिर्ण व्हावेच लागेल. तरच त्यांना वरिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यापीठात नियम व निकषानुसार सहयोगी प्राध्यापकांची नोकरी मिळू शकेल. अन्यथा पीएच.डी होऊन नुसती पदवी मिळेल.

LEAVE A REPLY

*