मायक्रोमॅक्स भारत ५ बाजारपेठेत दाखल

0
मायक्रोमॅक्स कंपनीने नवीन स्मार्टफोन मालिका सुरू करण्यात आली आहे. मायक्रोमॅक्स भारत ५ फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

नवीन मायक्रोमॅक्स इंडिया ५ हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्सचा नवीन मोबाईल्स फोन बाजारपेठेत दाखल होणार असून ग्राहकांना कोण्याही दुकानांवर सहज उपलब्ध होणार आहे. या मोबाईल्स फोन मध्ये ५० जीबी डेटा देण्यात येणार आहे. मायक्रोमॅक्स इंडिया ५ मध्ये ५.२ इंची एचडी स्क्रीन प्रदान करण्यात आला आहे.

त्यामध्येे १.३ जीएचझेड क्वाड-कोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज असून ते ६४ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड द्वारे स्टोरेज वाढविता येणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फोटो कॅ मेरा फोटोग्राफीसाठी फ्लॅश देण्यात आला आहे.

आता स्मार्टफोनचे सर्वात महत्वाचे वैशिष्टये म्हणजे बॅटरी. फोनला शक्ती देण्यासाठी ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोबाईल्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ४.० आणि रेडिओ एफएम सारख्या सुविधा देखील प्रदान करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*