सॅमसंगचे नवीन स्मार्टवॉच

0
सध्याच्या इलेक्टॉनिक्सच्या बाजारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. तसेच नवनवीन वस्तूंना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे मोबाईलच्या बाजारात पेठेत दररोज नवीन मोबाईल येत असतात. यामध्ये सॅमसंग कंपनीने आपली मोठी प्रतिमा तयार केलेली आहे.

मात्र स्मार्टफोनप्रमाणे या कंपनीने स्मार्टवॉच सुद्धा तयार केली असून या स्मार्टवॉचला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून त्याला चांगलीच मागणी होत असल्याचे चित्र बाजार पेठेत दिसून येत आहे.

सॅमसंगने जीपीएस लेस स्पोर्ट्स ब्रँड गियर फिट २ प्रो आणि गियर स्पोर्ट स्मार्टवॉच लॉन्च केला. या स्मार्टवॉचमध्ये १.२ इंच एमोलेड डिस्प्ले आणि फिरणारा बेजल यूजर इंटरफेस प्रदान केला आहे. तसेच यात २०० मिलीऍम्पियर्सची बॅटरी असून ती वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणे शक्य असल्याचे कंपनीने दावा केला आहे.

त्याचप्रमाणे यात गियर फिट २ प्रो फोनला ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याची बॅटरी २०० मिलीऍम्पियर्सची असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

*