बोंड अळीचा प्रार्दुभाव, आठवड्यात कपाशीचे पीक नष्ट करा : सहकृषी संचालंकांचे पहूर येथे आवाहन

0

पहूर, ता. जामनेर, | वार्ताहर :  सेंद्रिय बोंडअळीने पहूरसह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोमवारी नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्यासह अधिकार्‍यांनी कसबेतील धनराज रघुनाथ लाहसे यांच्या शेतात पाहणी करून संपूर्ण शेतकर्‍यांनी ङ्गरदड कापूस पिक आठवड्याभरात जाळून नष्ट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली आहे.

जेमतेम कापसाची एक दोन वेचणी होत नाही तोच सेंद्रिय बोंड अळीने कापूस पिक संपुष्टात आले असून ङ्गरदडही शेतकर्‍यांच्या हातातून गेली आहे. बोंड अळीच्या प्रार्दुभावाने शेतकरी चिंतेत आहे. यासाठी धनराज लाहसे यांच्या शेतात विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी आर एन जाधव, मंडळ अधिकारी एस डी कुलकर्णी, चव्हाण, जी एस ब्राम्हदे, उपसरपंच योगेश भडांगे, पुंडलिक भंडागे,रामलाल भडांगे, मोतीलाल क्षिरसागर, अशोक बनकर यांच्या सह शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आठवड्यात कपाशी पिक नष्ट करा- सेंद्रिय बोंडअळीचे अन्न कपाशी पिक असून त्यावर तिचे जिवनमान अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रभावी किटकनाशकामुळे अळी नष्ट होणे शक्य नाही. त्यामुळे ङ्गरदड न घेता संपूर्ण शेतकर्‍यांनी कपाशीला आठवड्याभरात जाळून नष्ट करावी, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.

बीजी बोलगार्ड वाण दोनवर बंदी नाही

संबंधित कपाशी बियाण्यांचे व कपाशीच्या पानांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. केंद्र सरकार कडून या वाणाला परवानगी आहे. याशिवाय दुसरे तंत्रज्ञान सध्या नाही.
त्यामुळे येत्या खरीपात यावाणावर बंदी राहणार नाही तसेच उपस्थित शेतकर्‍यांनी कपाशीला आधारभूत भाव मिळण्याची मागणी त्यांचेकडे केली.

LEAVE A REPLY

*