चाळीसगाव बस आगाराचा भोंगळ कारभार : पासेससाठी विद्यार्थ्यांची तारांबळ

0
चाळीसगाव, |  प्रतिनिधी :  विद्यार्थांच्या शिक्षणासाठी शासन अनेक योजनाच्या माध्यमातून शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून प्रयत्नशिल आहे. चाळीसगाव येथे मात्र आगाराच्या भोंगळ कारभारामुळे, बसचा पासेससाठी विद्यार्थांनी तासोंतास रागेत उभे राहवे लागत आहे.

यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक व आर्थिक नूकसान होत आहे, तक्रारी करुन देखील अनेक वर्षांपासून हि समस्या सुटत नसल्यामुळे दोषी आधिकर्‍यांवर कारवाईची मागणी विद्यार्थांकडून केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यामध्ये चाळीसगाव तालुक्याचा नाव घेतले जाते. तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज मोठ्या प्रमाणात सर्व वयोगटातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यसाठी, शहरात चाळीसगाव येथे येतात. तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव आगारात दररोज जवळपास ८ ते १० हजार प्रवाशांची संख्या असते.

ग्रामीण भागात शहरात शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थांना पासेससाठी येथील अगारातून नेहमीच वाईट अनुभव येत असून हाल सहन करावे लागतात. ग्रामीण भागातून माध्यमिक ते महाविद्यापर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी अप-डाऊन करतात. यात मुलीची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

दरमहिन्याला विद्यार्थांना पास काढण्यासाठी जवळपास चार ते पास तास उभे राहवे लागते. तसेच लहान वयोगटातील विद्यार्थांना तर पास काढण्यासाठी मोठी कसरतच करावी लागते. तर काही मोलमजुरी करणारे पालक कामधंदा सोडुन आपल्या पाल्याचा पास काढण्यासाठी तासोंतास उभे राहतात. यामुळे विद्यार्थांच्या आर्थिक, शारिक व मानसिक नुकसान होत आहे.

आगारातर्फे विद्यार्थांना पास देण्यासाठी दोनच खिडक्या उपलब्ध आहेत. परंतू विद्यार्थांची संख्या पाहता ह्या खिडक्या अपूर्ण पडतात. मध्यंतरी विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतू पुन्हा ती बंद करण्यात आली आहे. पास काढण्यासाठी चार ते पास तास रांगेत उभे राहवे लागत असल्यामुळे विद्यार्थींही हे आगारवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. तसेच काहीनी २० रुपय जादा घेऊन, ब्लॅकने पास काढुन देत असल्याचा आरोप पास देणार्‍या कर्मचार्‍यांवर केला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकारची आता लोकप्रतिनिधीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी विद्यार्थींकाडुन केली जात आहे.

विद्यार्थी व पालकांच्या संतप्त भावना

पास काढण्यासाठी खूप वेळ लागतो, लहान मुलांचा तर नबंरच लागू दिला जात नाही, असे हेमंत पाटील याने सांगितले. संकाळी ९ पासून पास काढण्यासाठी उभी आहे. तीन वाजले तरी देखील पाससाठी माझा नबंर लागत नाही. त्यामुळे आमचा खूप वेळ वाया जात आहे, असे अर्चना पाटील (टाकळी प्र.दे.) हिदे सांगितले.

दर महिन्याला पास काढण्यासाठी त्रास सहन करावा लगतो. तासोंतास रांगेत उभे राहावे लागते. परंतू आगाराला याबाबत काही एक देणेघेणे नाही आहे. पास नसल्यामुळे भाडे काढावे लागत आहे. शासनाकडून सुविधा पुरविल्या जातात, परंतू आगाराच्या भोंगळ करभारामुळे त्या व्यवस्थित राबविल्या जात नाहीत, अशी संतप्त भावना नुतन सुर्यवंशी (वाघळी)हीने व्यक्त केली.

मोलमजुरी करुन पोटभरातो. मुलगा तासनतास उभे राहुनही त्याला वेळेवर पास भेटला नाही. त्यामुळे आता कामधंदा सोडुन रोजंदारी बुडऊन मुलाचा पास काढण्यासाठी रांगेमध्ये उभा आहे. पास काढण्यासाठी खिडकीची संख्या वाढविण्यात यावी हिच अपेक्षा आहे, असे पालक नाना हिला गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*