पक्षाच्या तक्रारीवरून शरद यादव, अली अनवर यांची खासदारकी झाली रद्द

0
मनाई करूनही विरोधी पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले जेडीयूचे नेते शरद यादव व अली अनवर यांचे राज्यसभेचे सदस्यत्व पक्षाने तक्रार केल्यानंतर रद्द करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी हे सदस्यत्व रद्द केले.

शरद यादव यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा पाच वर्षाचा तर अली अनवर यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ बाकी होता. जेडीयूने मनाई करूनही शरद यादव यांनी पाटणामधील लालूप्रसाद यादव यांच्या भाजप भगावो देश बचावो या कार्यक्रमात सहभाग घेवून नितीश सरकारवर ताशेरे ओढले होते.

त्यांची ही भूमिका पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याने त्यांच्याबाबत पक्षानेच तक्रार दिली होती. त्यावरून त्यांचे सदस्यत्व( खासदारकी) रद्द करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*