मंत्र्यांच्या वेतनासह भत्त्यांत होणार घसघसीत वाढ

0
मुंबई : राज्यातील कॅबिनेट मंत्र्यासह राज्य मंत्र्यांच्या वेतनासह विविध भत्त्यांत आता घसघसीत वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला नसले तरी मंत्र्यांना मात्र ‘अच्छे दिन’ येणार आहेत. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने केलेल्या वेतनवाढीनंतरची ही दुसरी वेतन वाढ आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांना सध्या पावणेदोन ते दोन लाखापर्यंत वेतन व इतर भत्ते मिळत आहेत. तेवढेच वेतन व भत्ते कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती यांना देण्यात येणार आहे.

तर राज्य मंत्री, विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष यांना अतिरीक्त मुख्य सचिवांइतकेच वेतनल व भत्ते देण्यात येणार आहेत. यासोबतच विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनाही दोन लाखापर्यंत वेतन व भत्ते देण्यात येणार आहे.

त्यांना संगणक परिचालक ठेवण्यासाठी दर महा दहा हजार रूपये भत्ताही दिला जाणार आहे. याबाबतचे विधेयक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

अच्छे दिन

हे विधेयक मंजुर झाले तर राज्यातील सामान्य जनतेला नसले तरी या मंत्र्यांना, विरोधीपक्षनेत्यांना मात्र ‘ अच्छे दिन’ येणार आहेत.

LEAVE A REPLY

*