गाळे ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा

0

जळगाव । मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून दोन महिन्यात प्रक्रिया करावी, असा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला होता.

या निर्णयाविरोधात काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या.ए.के.सिक्री व न्या.अशोक भुषण यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली. त्यामुळे आता गाळे ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला असून कोणत्याही क्षणी कार्यवाही करण्याचे संकेत देखील प्रशासनाने दिले आहे.

मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने दि.14 जुलै 2017 रोजी दोन महिन्यात गाळे ताब्यात घेवून मनपा प्रशासनाने पुढील प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता.

या निकालामुळे गाळेधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज न्या.ए.के.सिक्री, न्या.अशोक भुषण यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले असता, गाळेधारकाची याचिका फेटाळली. मनपातर्फे अ‍ॅड.जयंत सुद तर गाळेधारकांतर्फे अ‍ॅड.हरीष साळवे, अ‍ॅड.एम.वाय.देशमुख यांनी काम पाहिले.

तीन दिवसाच्या अल्टीमेटमसाठी केला होता ठराव
औरंगाबाद खंडपीठाने गाळे ताब्यात घेण्याचा प्रक्रियेसाठी दोन महिन्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही प्रशासनाने प्रक्रिया केली नाही.

त्यामुळे मागील महिन्यात झालेल्या महासभेत तीन दिवसाचा प्रशासनाला अल्टीमेटम देवून न्यायालयाचा अवमान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा ठराव देखील माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडला होता. सर्वोच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका आता फेटाळल्यामुळे कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

*