सरसंघचालकांचा जळगावात तीन तास मुक्काम

0

जळगाव । सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जळगावात एका स्वयंसेवकाकडे तब्बल तीन तास मुक्काम केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज जिल्हा दौर्‍यावर होते.

आज सकाळी 7 वा. दादर-अमृतसर एक्सप्रेसने त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत प्रचारक रामानंद काळे, विजय पुराणिक, प्रशांत देवरे यांच्यासह स्वयंसेवक होते.

जिल्हा संपर्क प्रमुख हितेश पवार यांच्या निवासस्थानी सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्याहारी घेतली. तब्बल तीन तास त्यांनी पवार यांच्या निवासस्थानी मुक्काम करून ते धरणगाव येथे बालु किसन चौधरी यांच्या मुलाच्या लग्नासाठी मार्गस्थ झाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जळगावी केलेल्या या मुक्कामाबाबत अनेकांनी माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

*