दरेगाव शिवारात नरभक्षक बिबट्याचा बालकावर हल्ला

0

चाळीसगाव । नरभक्षक बिबट्याने आता वरखेडे शिवारातून आमदार उन्मेष पाटील यांचे गाव असलेल्या दरेगाव येथे शिरकाव केला आहे.

सोमवारी दरेगाव शिवारात आई-वडीलांसोबत कपाशी वेचणी करणार्‍या आठवर्षीय बालकावर हल्ला केला. वडिलांनी बिबट्याच्या दिशेने कुर्‍हाड भिरकावल्यामुळेे सुदैवाने बालक वाचल आहे.

परंतू त्यांच्या मानेवर गंभीर स्वरुपाच्या जखमा बिबट्याने केल्या आहेत. बालकाला पुढील उपचारासाठी धुळे ग्रामीण रुग्णालयात येथे रवाना करण्यात आले आहे.

चंदरसिंग सोनवणे हा पत्नी व मुलगा दादू चंदरसिंग सोनवणे(08) यांच्यासह वरखेडे शिवरापासून अवघ्या चार किलोमिटरवर असलेल्या दरेगाव येथे शेतात कापुस वेचनी करत असताना, सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आधिपासूनच दबा धरुन बसलेल्या नरभक्षक बिबट्याने दादू सोनवणे यांच्यावर हल्ला केला.

बिबट्या हल्ला करताच बालकाने आरडा-ओरड केली असता चंदरसिंग सोनवणे यांनी बिबट्या दिशेने जवळ असलेली कुर्‍हाड भिरकावली तसेच पती-पत्नी आरडा-ओरड केल्यानतंर बिबट्या तेथून धूम ठोकली.

सुदैवाने बिबट्याचे जबड्यात बालकाची टि-शर्टाची कॉलर आल्यामुळे तो जबर हल्ला करु शकला नाही. परंतू बालकाच्या मानेवर हल्ला केल्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

बलाकाला उपचारयासाठी तत्काळ चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर प्राथमिक रुपचार केल्यानतंर पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कैलास देवरे यांच्यासह आधिपासून तळ ठोकुन बसलेल्या वनविभागाच्या आधिकारी व कर्मचार्‍यानी धाव घेतली असून ते बिबट्या शोधा साठी परिसर पिजून काढत आहेत.

तसेच त्याभागात बिबट्याचा बंदोबस्तासाठी शार्पशूटरसह वनविभागाची एक टिम तैनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*