शासकीय कामात अडथळा : चंद्रशेखर अत्तरदेंविरुध्द गुन्हा दाखल

0

जळगाव । शासकीय कामात अडथळा निर्माण करून बांधकाम विभागातील कर्मचार्‍यास अश्लिल शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्या विरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी दि.30 रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात येवून पाचोरा तालुक सावखेडा बुदु्रक व चोपडा तालुक्यातील कर्जाणे, देवझिरी, सत्रासेन येथील आरोग्य केंद्राच्या निविदेवरून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व कर्मचारी चंद्रभान पाटील यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांच्या टेबल वर ठेवलेल्या सरकारी फाईल ओढून जमीनीवर फेकत चंद्रशेखर अत्तरदे यांनी मोबाईल क्रमांक 9518706346 वरुन बांधकाम विभागाचे कर्मचारी चंद्रभान शलिग्राम पाटील यांच्या मोबाईल क्रमांक 9421520450 व 8805511077 वर फोन करून अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशावरून बांधकाम विभागाचे कर्मचारी चंद्रभान शलिग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे रा. गणेश कॉलनी यांच्या विरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

*