खड्डेमुक्तच्या कामात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

0

जळगाव । खड्डेमुक्त रस्ते मोहिम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबर पर्यंत सर्व प्रमूख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत.

जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांचेवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून जे अधिकारी वेळेत काम पूर्ण करतील त्यांचा विभागाच्यावतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

खड्डेमुक्त रस्ते मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हयातील रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.पाटील यांनी आज येथील अजिंठा विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, श्री. मोराणकर यांचेसह विभागाचे प्रमूख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हयातील राष्ट्रीयमार्ग, राज्यमार्ग, प्रमूख जिल्हा मार्गांची परिस्थिती, त्यावरील खड्डयांची परिस्थिती, किती किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, किती कामे अपूर्ण आहे याचा उपविभागनिहाय आढावा घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

ज्या अधिकार्‍याच्या उपविभागातील कामे अपूर्ण आढळून येतील, त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जे अधिकारी वेळेत कामे पूर्ण करतील. त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*